VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली /चामोर्शी,२४ जुलै २०२६::- महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, चामोर्शी तालुक्याच्या वतीने आयोजित ‘सेवा महोत्सव २०२६’ अंतर्गत चामोर्शी येथील साधूबाबा कुटी हनुमान मंदिर परिसरात स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम उत्साहात पार पडला.
या उपक्रमामध्ये मंदिर परिसराची स्वच्छता करून परिसराला स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक स्वरूप देण्यात आले. त्याचबरोबर विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि सामाजिक उत्तरदायित्व जपत भाजप कार्यकर्त्यांनी श्रमदानातून या अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्षा रोशनी स्वप्निल वरघंटे, नरेश अल्सावार, निरज रामानुजमवार, रेवनाथ कुसराम, सोपान नैताम, रंजना तालेवार यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी “स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन हीच भावी पिढीसाठीची सर्वोत्तम भेट” हा संदेश देत प्रत्येक नागरिकाने स्वच्छता राखण्यासह वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन केले. पर्यावरणाचे संरक्षण, स्वच्छ परिसर आणि हरित भवितव्य निर्माण करण्याच्या संकल्पाने हा उपक्रम पार पडला.
‘सेवा महोत्सव २०२६’ अंतर्गत राबविण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले असून, समाजहितासाठी अशा विधायक उपक्रमांची परंपरा पुढेही कायम राहावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
