Thursday, August 6, 2026
HomeChamorshiशिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, चामोर्शी येथे पालक-शिक्षक संघाची नवीन कार्यकारिणी गठित...

शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, चामोर्शी येथे पालक-शिक्षक संघाची नवीन कार्यकारिणी गठित…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली /चामोर्शी,०६ ऑगस्ट २०२६::- शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, चामोर्शी येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी पालक-शिक्षक संघाची सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी तसेच पालक आणि शिक्षक यांच्यात सुसंवाद व समन्वय अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने आयोजित या सभेत पालक-शिक्षक संघाच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

सभेच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य धनेद्र चौधरी होते, तर उपप्राचार्य श्याम भर्रे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी मागील कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

सभेला विधीतज्ञ ॲड. प्रेमाताई आईंचवार यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच पालक प्रतिनिधी म्हणून रविभाऊ खरवडे, नितेश गट्टीवार, विजय कुनघाडकर, सुभाष रॉय, पुरुषोत्तम वासेकर, पी. जी. दुबे, मनीष उंदिरवाडे, मधुकर उराडे, अनिल भांडेकर, संजय बुरांडे, एकनाथ बुरांडे, सतीश देवगिरीकर, जावेद शेख, आबाजी बोधलकर, अरविंद पिपरे, सुधाकर रामटेके, रुपेश नैताम, विनोद कोटांगले आणि मोहन बोटरे उपस्थित होते. याशिवाय किशोरीताई मोते, हेमलता रायपुरे, रोशनी गेडाम, शिल्पा बुरांडे, मोनिका गडकर आणि निरुता गर्दे यांचीही उपस्थिती होती.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे प्रमुख प्रा. नाझीम शेख, पालक-शिक्षक संघाचे उपप्रमुख डॉ. पंकज नरुले, महिला तक्रार निवारण समिती प्रमुख भाग्यश्री पित्तुलवार, सखी सावित्री समिती प्रमुख प्रा. मंगला उराडे तसेच विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकास समिती प्रमुख प्रा. माया रामटेके यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यानंतर पालक-शिक्षक संघाच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यामध्ये प्राचार्य धनेद्र चौधरी यांची अध्यक्ष, नितेश गट्टीवार यांची उपाध्यक्ष तर संजय बुरांडे यांची सहसचिव म्हणून निवड करण्यात आली. सदस्य म्हणून मोनिका गडकर, पुरुषोत्तम वासेकर, अनिल भांडेकर, मधुकर उराडे, सतीश देवगिरीकर, जावेद शेख, विनोद कोटांगले, मनीष उंदिरवाडे, रोशनी गेडाम, हेमलता रायपुरे, सीमाताई पतगे, किशोरीताई मोते, उमाकांत अल्लीवार, सुभाष रॉय आणि रविभाऊ खरवडे यांची निवड करण्यात आली.

सभेमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी पालकांचा सक्रिय सहभाग, नियमित उपस्थिती, शिस्त, स्पर्धा परीक्षा, करिअर मार्गदर्शन, डिजिटल शिक्षण आणि शाळेच्या सर्वांगीण विकासासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. पालकांनी विविध विधायक सूचना मांडल्या. शाळा प्रशासनाने सर्व सूचनांचे स्वागत करून पालकांच्या सहकार्याने विद्यार्थीकेंद्रित उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.

 **प्राचार्य धनेद्र चौधरी म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालक आणि शिक्षक यांच्यातील सुसंवाद व सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. पालक-शिक्षक संघाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासह त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे कार्य करणे आवश्यक आहे.”* 

कार्यक्रमाचे संचालन पंकज नरुले व आभार प्रदर्शन प्रा अश्विनी मडावी यांनी केले सभेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक प्रतिनिधी आणि उपस्थित मान्यवरांनी मोलाचे सहकार्य केले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular