Tuesday, September 22, 2026
HomeChamorshiचवडेश्वरी गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम; मोफत आरोग्य शिबिरात ५७ नागरिकांची तपासणी...

चवडेश्वरी गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम; मोफत आरोग्य शिबिरात ५७ नागरिकांची तपासणी…

VAINGANGA NEWS 24 /विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली /चामोर्शी, 22 सप्टेंबर 2026::- गणेशोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत चवडेश्वरी गणेश मंडळ, चामोर्शी यांच्या वतीने नुकतेच मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा, तपासणी तसेच आवश्यक मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या आरोग्य शिबिरात एकूण ५७ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये रक्तदाब (BP), रक्तातील साखर (शुगर), हिमोग्लोबिन (HB), सीबीसी (CBC), मलेरिया यासह विविध आवश्यक रक्ततपासण्या करण्यात आल्या. प्राथमिक आरोग्य तपासणीसोबतच नागरिकांना आरोग्यविषयक आवश्यक मार्गदर्शनही देण्यात आले.

शिबिराचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष साहिल पेशटीवार, उपाध्यक्ष श्रावण चौधरी आणि सचिव अभिषेक कोत्तावार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिबिराच्या आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

या उपक्रमाला वैद्यकीय व आरोग्य पथकाचे मोलाचे सहकार्य लाभले. डॉ. रुपाली बांडगे, आरोग्य सेविका ताई उईके, तुषार मंगेर (मा. सेवक), पितांबर मेश्राम, सपना येरमे, मिलिंद बन्सोड आणि संगीता यांनी नागरिकांची तपासणी व आरोग्यसेवेत योगदान दिले.

गणेशोत्सवाच्या काळात केवळ धार्मिक कार्यक्रमांपुरते मर्यादित न राहता सामाजिक उपक्रम राबविण्याच्या मंडळाच्या या प्रयत्नाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले. आरोग्य शिबिरामुळे नागरिकांना त्यांच्या आरोग्याची प्राथमिक तपासणी करून घेण्याची संधी मिळाली. चवडेश्वरी गणेश मंडळाने भविष्यातही अशाच प्रकारचे सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम सातत्याने राबवावेत, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular