Saturday, September 5, 2026
HomeChamorshiपत्रकार सेवा प्रतिष्ठानतर्फे पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांचा सत्कार...

पत्रकार सेवा प्रतिष्ठानतर्फे पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांचा सत्कार…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

चामोर्शीत कायदा-सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी पत्रकार-पोलिसांमध्ये समन्वयाची अपेक्षा,

गडचिरोली/चामोर्शी,०८ ऑगस्ट २०२६::-चामोर्शी पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांचा पत्रकार सेवा प्रतिष्ठान, चामोर्शीच्या वतीने उत्साहात सत्कार करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन पोलीस निरीक्षक ढाकणे यांचे स्वागत केले.

चामोर्शी तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासोबतच नागरिकांच्या समस्या प्रभावीपणे सोडविणे, सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणे आणि पोलीस प्रशासन व नागरिकांमध्ये विश्वासाचे नाते अधिक दृढ करण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्त्वाची असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.

नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांनीही पत्रकार सेवा प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानत चामोर्शीतील कायदा-सुव्यवस्था, नागरिकांच्या सुरक्षिततेला आणि जनतेच्या सहकार्याला प्राधान्य देण्याचा विश्वास व्यक्त केला. पत्रकार व पोलीस प्रशासन यांच्यातील सकारात्मक समन्वयातून समाजहिताचे अनेक उपक्रम प्रभावीपणे राबविता येतील, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

या सत्कार कार्यक्रमाला पत्रकार सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद खोबे, सचिव अरुण गव्हारे, कार्याध्यक्ष नितेश गट्टीवार, उपाध्यक्ष श्रावण वाकोडे व धनराज वासेकर, कोषाध्यक्ष मारोती बारसागडे, सहसचिव हस्ते भगत, सदस्य पुंडलिक भांडेकर, प्रफुल्ल कोटांगले यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

नव्या पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली चामोर्शी तालुक्यात कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम होऊन नागरिकांना सुरक्षित व विश्वासार्ह वातावरण मिळेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular