VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
स्थलांतरित, मय्यत व नवीन मतदारांच्या नावांची यादी वाचून दाखवली; ग्रामस्थांची उपस्थिती,
गडचिरोली /एटापल्ली,०७ ऑगस्ट २०२६::- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीच्या विशेष पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेअंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय तोडसा येथे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी मतदार यादीतील बदलांची माहिती ग्रामस्थांसमोर वाचून दाखविण्यात आली.

तहसील कार्यालय एटापल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी कार्यालय तोडसा येथील कु. पल्लवी दडमल यांनी मतदार यादीतील स्थलांतरित मतदारांची नावे, मय्यत व्यक्तींची नावे, नवीन मतदारांची नावे तसेच मतदार यादीच्या पुनर्रचनेशी संबंधित माहिती सभेत वाचून दाखविली. यामुळे मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेला चालना मिळाली.

या विशेष सभेला ग्रामपंचायतीच्या सरपंच कु. वनिता कोरामी, उपसरपंच श्री. प्रशांत आत्राम, ग्रामपंचायत सदस्य श्री. गणेश दुर्वा, प्रमोद बडा, भिवा गावडे, रमेश गावडे, नामदेव दुर्गे, कालीदास तिम्मा, मासु गावडे, रुबीन टोपो यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
मतदार यादीतील नावांबाबत पारदर्शकता राखण्यासाठी तसेच पात्र मतदारांची नावे यादीत समाविष्ट होऊन अपात्र, स्थलांतरित अथवा मय्यत व्यक्तींची नावे योग्यरीत्या वगळण्यासाठी SIR प्रक्रिया महत्त्वाची ठरत आहे. ग्रामपातळीवर घेण्यात आलेल्या या विशेष सभेमुळे नागरिकांना मतदार यादीतील बदलांची माहिती मिळाली.
