Sunday, September 6, 2026
HomeChamorshiकन्नमवार जलाशयाचे पाणी रोवणीसाठी सोडले...

कन्नमवार जलाशयाचे पाणी रोवणीसाठी सोडले…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांच्या निर्देशांची तत्काळ अंमलबजावणी; चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा,

गडचिरोली/चामोर्शी,(घोट) ११ ऑगस्ट २०२६::-चामोर्शी तालुक्यातील रेगडी–हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या निर्देशानुसार रेगडी येथील दीना धरण अर्थात कन्नमवार जलाशयाचे पाणी धान रोवणीसाठी सोडण्यात आले. जलाशयाचे विधिवत जलपूजन करून पाणी सोडण्यात आल्याने परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतांमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध नव्हते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या धान रोवण्या खोळंबल्या होत्या. काही शेतकरी मोटारपंपाच्या सहाय्याने रोवणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, सिंचनासाठी जलाशयाचे पाणी सोडण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती.

या मागणीची दखल घेत आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी कन्नमवार जलाशयाचे पाणी तातडीने सोडण्याचे निर्देश दिले. मुंबईहून भ्रमणध्वनीद्वारे बोलताना त्यांनी, “मतदारसंघातील शेतकरी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू,” अशी ग्वाही दिली.

त्यानंतर आज भारतीय जनता पार्टीचे जिल्हा व चामोर्शी मंडळ पदाधिकारी तसेच घोट सुभाष ग्राम मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घोट मार्गावरील गोलाबाई देवस्थान येथे पूजन करण्यात आले. त्यानंतर स्थानिक अभियंता विकास दूधबळे व उपअभियंता यांच्या प्रमुख उपस्थितीत कन्नमवार जलाशयाच्या पाण्याचे विधिवत पूजन करून जलाशयाचे पाणी सोडण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा भाजप जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे, माजी जि.प. सदस्य नामदेव सोनटक्के, घोटच्या सरपंच रूपाली ताई दूधबळे, घोट मंडळ अध्यक्ष राकेश सरकार, चामोर्शी मंडळ अध्यक्ष रोशनी ताई वरघंटे, महामंत्री संजय खेडेकर, विकास मैत्र, सौ. कविता किरमे, विलास उईके, राजेश्वर चौधरी, नीरज रामानुजनवार, नरेश अलसावार, श्रावण सोनटक्के, माणिक कोहळे, प्रशांत पालारपवार, विनोद किरमे, रोहिदास धोटे, संतोष दूधबळे, आनंदराव सातपुते, सुमेन विश्वास, पलाश घरामी, महेश विश्वास, पोपट आभारे, सोम वैद्य, उपसरपंच मिहीर विश्वास, सुकंठ रॉय, प्रकाश सातपुते, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जलाशयाचे पाणी सोडण्यात आल्याने आता रखडलेल्या धान रोवणीला वेग येणार असून चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular