Saturday, September 5, 2026
HomeChamorshiपूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पवन सरपेचे घवघवीत यश...

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पवन सरपेचे घवघवीत यश…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

मुरखळा मालच्या जि.प. शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा; तालुक्यात तृतीय क्रमांक,

गडचिरोली /चामोर्शी,१७ ऑगस्ट २०२६::- महाराष्ट्र राज्य पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या गुणवत्ता यादीत जि.प. उच्च प्राथमिक शाळा, मुरखळा माल येथील इयत्ता सातवीचा विद्यार्थी पवन रवींद्र सरपे याने उल्लेखनीय कामगिरी करत तालुकास्तरावर तृतीय क्रमांक पटकावला आहे. त्याच्या या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा पुन्हा एकदा उमटला असून, सर्व स्तरांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

पवन सरपे याने शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवत तालुकास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही मेहनत, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन करता येते, हे पवनच्या कामगिरीने सिद्ध केले आहे.

पवनच्या या यशामुळे जि.प. उच्च प्राथमिक शाळा, मुरखळा मालच्या शैक्षणिक प्रगतीत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांकडून घेतले जाणारे परिश्रम आणि पालकांचे सहकार्य यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी सातत्याने उंचावत असल्याचे दिसून येत आहे.

पवनच्या यशाबद्दल ग्रामपंचायत मुरखळा मालचे सरपंच भास्कर बुरे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा रूपाली मुमडवार, उपाध्यक्ष लोशन रामटेके, समितीचे सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र धोडरे, पदवीधर शिक्षक गणेश बोईनवार, पदवीधर शिक्षक रघुनाथ भांडेकर, सहायक शिक्षक अशोक जुवारे, चंद्रकांत वेटे, जगदिश कळाम, राजकुमार कुळसंगे, जगदिश बावणे यांच्यासह शाळेतील शिक्षक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

पवनच्या या उज्ज्वल यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत असून, त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular