Sunday, September 6, 2026
HomeChamorshiमार्कंडादेव येथील वैनगंगा तीरावर प्रथमच विधिवत गंगापूजनासह महाआरती...

मार्कंडादेव येथील वैनगंगा तीरावर प्रथमच विधिवत गंगापूजनासह महाआरती…

VAINGANGA NEWS 24 /विशेष प्रतिनिधी,

श्रावण सोमवारनिमित्त हजारो भाविकांची उपस्थिती; धार्मिक वातावरणात पार पडला ऐतिहासिक सोहळा,

गडचिरोली/चामोर्शी ,१८ ऑगस्ट २०२६::- पवित्र श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारनिमित्त चामोर्शी तालुक्यातील ऐतिहासिक मार्कंडादेव येथे भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी उत्तरवाहिनी वैनगंगा नदीच्या पवित्र तीरावर प्रथमच विधिवत गंगापूजन व महाआरती करण्यात आली. या सोहळ्याला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भक्तिभावाने सहभाग घेतला.

मार्कंडादेव हे गडचिरोली जिल्ह्यातील प्राचीन आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून श्रावण महिन्यात येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात. यंदा वैनगंगा नदीच्या पवित्र तीरावर आयोजित करण्यात आलेल्या गंगापूजन व महाआरतीमुळे या धार्मिक सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

श्रावण सोमवारच्या निमित्ताने पहाटेपासूनच मार्कंडादेव मंदिर परिसरात भाविकांची गर्दी होऊ लागली होती. ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. त्यानंतर वैनगंगा नदीच्या तीरावर विधिवत पूजन, गंगाआरती आणि महाआरती पार पडली. यावेळी नदीकाठचा परिसर दीपमाळांनी आणि भक्तिमय वातावरणाने उजळून निघाला.

मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या धार्मिक उपक्रमामुळे मार्कंडादेवच्या धार्मिक पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. ऐतिहासिक वारसा, धार्मिक श्रद्धा आणि निसर्गसौंदर्य यांचा संगम असलेल्या मार्कंडादेव परिसराच्या विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले.

महाआरतीच्या वेळी हजारो भाविकांनी एकत्रितपणे सहभाग घेतल्याने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. भाविकांमध्ये या आगळ्यावेगळ्या धार्मिक सोहळ्याबद्दल उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular