Saturday, September 5, 2026
HomeChamorshiचामोर्शीत रोजगार मेळाव्याला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...

चामोर्शीत रोजगार मेळाव्याला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

२०७ युवक-युवतींची नोंदणी; कौशल्यविकासासह रोजगाराच्या संधींबाबत प्रकाश पोळ गटविकास अधिकारी मार्गदर्शन केले,

गडचिरोली/चामोर्शी,१० ऑगस्ट २०२६::- ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने लॉयड मेटल, मिशन फॉर ग्लोबल स्किल इंटरशिप, बोदली आणि पंचायत समिती चामोर्शी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि. १९) चामोर्शी येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला परिसरातील युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

रोजगाराच्या अपेक्षेने मोठ्या संख्येने युवक-युवती मेळाव्यात सहभागी झाले. यावेळी लॉयड मेटल कंपनीच्या प्रतिनिधींनी उमेदवारांची नोंदणी करून त्यांच्याकडून आवश्यक माहिती व कागदपत्रांची पूर्तता करून घेतली. मेळाव्यात  १६७ युवक आणि ४० युवती अशा एकूण  २०७ उमेदवारांची नोंदणी करण्यात आली.

यावेळी कंपनीच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या विविध संधी, आवश्यक कौशल्ये, प्रशिक्षण तसेच निवड प्रक्रियेबाबत उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. रोजगाराच्या बदलत्या स्वरूपानुसार युवकांनी आवश्यक कौशल्ये आत्मसात करून उपलब्ध संधींचा लाभ घ्यावा, असा संदेश यावेळी देण्यात आला.

पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी उपस्थित युवकांना मार्गदर्शन करताना रोजगाराच्या संधींचा योग्य प्रकारे उपयोग करून कौशल्यविकासाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अशा रोजगार मेळाव्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले.

मेळाव्याला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, लॉयडचे प्रोग्राम मॅनेजर दिनेश बोरसे, मोबिलायझेशन कोऑर्डिनेटर चंद्रशेखर पवार, मोनाली बोरकर, ज्ञानकी सोरेन, सिद्धार्थ वाकडे चामोर्शी तालुका मार्गदर्शक (मेंटर), सुधीर कोडापे मुलचेरा तालुका मार्गदर्शक (मेंटर), तुषार कर्णे ,श्रावण वाकोडे, नितेश गट्टीवार, विजय लाड ,भावना रामटेके मॅडम उमेद ऑफिस चामोर्शी यांच्या माध्यमातून आजच्या मेळाव्याचे संचालन आणि आभार प्रदर्शन करण्यात आले या मेळाव्याला मॅडम चे खूप सहकार्य मिळाले.

दरम्यान, रोजगाराच्या संधी मिळण्याच्या अपेक्षेने युवक-युवतींनी मोठ्या उत्साहाने मेळाव्यात सहभाग घेत नोंदणी केली. ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांना स्थानिक पातळीवर रोजगार व कौशल्यविकासाच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

रोजगाराच्या संधींसाठी युवकांचा वाढता सहभाग पाहता, भविष्यातही अशा प्रकारचे रोजगार मेळावे सातत्याने आयोजित करण्याची गरज व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular