VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली ,१९ ऑगस्ट २०२६::- महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती प्राथमिक शिक्षक संघटना, जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने जिल्हा परिषद गडचिरोली येथे नव्याने रुजू झालेले शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मा. श्री. प्रेरक उजागरे तसेच उपशिक्षणाधिकारी मा. श्री. परसावार यांची सदिच्छा भेट घेऊन शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तसेच शिक्षकांना भेडसावणाऱ्या प्रमुख अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शिक्षकांच्या समस्या प्रशासनाच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्याची मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

यावर नवनियुक्त शिक्षणाधिकारी मा. श्री. प्रेरक उजागरे यांनी लवकरच जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी सकारात्मक व प्रभावी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष श्री. रघुनाथ भांडेकर, प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष श्री. योगेश ढोरे, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष श्री. पुंडलिक देशमुख, आदर्श शिक्षक समितीचे जिल्हाप्रमुख श्री. प्रदीप सेलोकर, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. गुरुदेव नवघडे यांच्यासह जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी श्री. धनपाल मिसार, श्री. राजेश चिल्लमवार, श्री. बापू मुनघाट, श्री. धनेश कुकडे, श्री. अमरदिप भुरले, श्री. आशिष धात्रक, श्री. देव लांजेवार, श्री. लोमेश उंदीरवाडे, श्री. साईनाथ अलोणे, श्री. राजेश बाळराजे, श्री. राजेंद्र भुरसे, श्री. डंबेश पेंदाम, श्री. सुनील मेंढे, श्री. प्रशांत काळे, श्री. राकेश रोकडे, श्री. राकेश सोनटक्के आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
नवनियुक्त शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याने जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्या लवकरच मार्गी लागण्याची अपेक्षा शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
