VAINGANGA NEWS 24 /विशेष प्रतिनिधी,
माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांची सहभागाची उपस्थिती; सुंदरकांड मंडळ व मित्र परिवाराचा उपक्रम,
गडचिरोली ,२० ऑगस्ट २०२६::- श्रावण महिन्याच्या पवित्र पर्वानिमित्त गडचिरोली शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘हर हर महादेव’च्या जयघोषात कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले. सुंदरकांड मंडळ व मित्र परिवाराच्या वतीने आयोजित या कावड यात्रेत माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी सहभागी होत भक्तिमय वातावरणात कावडधारकांसोबत यात्रा केली.
श्रावण महिन्यात भगवान महादेवाच्या भक्तीला विशेष महत्त्व असून, या पार्श्वभूमीवर कावड यात्रेत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले. भगवे ध्वज, फुलांनी सजविलेल्या कावडी आणि ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.
या यात्रेचा शुभारंभ दुर्गा मंदिरापासून करण्यात आला. पारंपरिक धार्मिक वातावरणात कावडधारकांनी उत्साहाने सहभाग घेतला. सुंदरकांड मंडळ व मित्र परिवाराच्या वतीने दरवर्षी या कावड यात्रेचे आयोजन करण्यात येत असून, यंदाही भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कावड यात्रेदरम्यान भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे सुंदर दर्शन घडले. माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांच्या सहभागामुळे यात्रेतील उत्साहात आणखी भर पडली.
