Saturday, September 5, 2026
HomeMulcheraदिना नदीपात्रात वृक्षतोडीचा धक्कादायक प्रकार; वनविभागाच्या भूमिकेवर संशय...

दिना नदीपात्रात वृक्षतोडीचा धक्कादायक प्रकार; वनविभागाच्या भूमिकेवर संशय…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

जेसीबी-पोकलेनच्या वापराचा आरोप; स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी,

गडचिरोली /मुलचेरा,२० ऑगस्ट २०२६::- तालुक्यातील उदयनगर–मुलचेरा मार्गालगत असलेल्या दीना नदीपात्रात मोठमोठ्या वृक्षांची कथितपणे तोड झाल्याचे समोर आले आहे. नदीपात्रात वृक्षांचे ओंडके आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकारामुळे वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

या कथित वृक्षतोडीसाठी जेसीबी व फोकलीनसारख्या यंत्रांचा वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. वनक्षेत्रातील वृक्षतोडीसाठी परवानगी घेण्यात आली होती का, नदीपात्रात यंत्रांचा वापर करण्यास मंजुरी होती का आणि तोडलेल्या वृक्षांचे पुढे काय झाले, याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

या प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विशेष जिल्हा प्रतिनिधी अमित कत्तीवार यांनी केली आहे.

दरम्यान, दीना नदीपात्रातील कथित वृक्षतोडीची वनविभागाकडून गांभीर्याने दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी व चौकशी करण्यात येणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular