VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली /चामोर्शी,२० ऑगस्ट २०२६::- तालुक्यातील मारोडा येथील तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी मारोती बारसागडे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे गावातील सामाजिक सलोखा, शांतता आणि परस्पर सामंजस्य अधिक बळकट होण्यास मदत होणार असल्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
मारोती बारसागडे यांच्या निवडीबद्दल गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हर्षद सोमणकर, संदीप सोमणकर, जीवन बारसागडे, राकेश चलाख, प्रदीप सोमणकर, देवा चूधरी, आशिष सातपुते, रुपेश गव्हरे, देविदास चलाख आदींनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
गावातील विविध तंटे व वाद सामोपचाराने आणि सलोख्याच्या वातावरणात सोडविणे, नागरिकांमध्ये परस्पर समन्वय वाढविणे तसेच सामाजिक ऐक्य आणि शांतता कायम राखणे, यासाठी तंटामुक्त समितीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर बारसागडे यांच्या नेतृत्वाखाली समिती अधिक प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
गावातील शांतता, सामाजिक ऐक्य आणि सलोखा टिकविण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार नवनिर्वाचित अध्यक्ष मारोती बारसागडे यांनी व्यक्त केला.
