VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली /देसाईगंज,२० ऑगस्ट २०२६::- आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. श्री. रामदास मसराम यांच्या वाढदिवसानिमित्त तालुका काँग्रेस कमिटी देसाईगंज व आमदार रामदासजी मसराम मित्रपरिवाराच्या वतीने कोरेगाव येथे भव्य महाआरोग्य तपासणी व चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शिबिरात हृदयरोग, हाडांचे आजार, स्त्रीरोग, नेत्ररोग यांसह विविध आजारांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. नागरिकांना आरोग्यविषयक आवश्यक मार्गदर्शन व सल्ला देण्यात आला. गरजू रुग्णांना औषधांचे वाटप करण्यात आले, तर नेत्र तपासणीनंतर चष्म्याची आवश्यकता असलेल्या नागरिकांना निःशुल्क चष्म्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत दर्जेदार व तज्ज्ञ आरोग्यसेवा पोहोचविणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. वाढदिवसानिमित्त केवळ शुभेच्छांचा वर्षाव न करता समाजोपयोगी उपक्रम राबविण्याची परंपरा जोपासली पाहिजे. अशा सेवाभावी उपक्रमांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याचे कार्य सातत्याने सुरू राहावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

या शिबिरास दिनेशजी कुर्जेकर, कोरेगावच्या सरपंच सौ. मिमिता आळे, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, माजी पंचायत समिती सभापती परसराम टिकले, वडसा तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले, जीवन पा. नाट, नितीन राऊत, डॉ. सत्यम गुप्ता, सुधाकरजी मडावी, नरहरी तुमराम, नरेंद्र गजपुरे, प्रशांत किलनाके, हंसराज लांडगे, काशिनाथ ताडे, धनपाल मिसार, उमेश बानूबाकोडे, मोतीराम राऊत, सौ. शालूताई दंडवते, सौ. मिमिताताई पेंदाम यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

आरोग्यसेवेच्या माध्यमातून समाजसेवेचा संदेश देणारे हे शिबिर नागरिकांसाठी उपयुक्त ठरले.
