Saturday, September 5, 2026
HomeGadchiroliगडचिरोलीच्या विकासासाठी ‘आकांक्षित जिल्हा’ समितीची विशेष बैठक...

गडचिरोलीच्या विकासासाठी ‘आकांक्षित जिल्हा’ समितीची विशेष बैठक…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

विविध विकासकामांवर सविस्तर चर्चा; माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची प्रमुख उपस्थिती,

गडचिरोली ,२२ ऑगस्ट २०२६::- आकांक्षित जिल्हा ते विकसित गडचिरोली या संकल्पनेला गती देण्यासाठी जिल्हा खनिज निर्माण समितीची विशेष बैठक नुकतीच गडचिरोली येथे पार पडली. या बैठकीत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासह विविध महत्त्वाच्या विकासकामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जिल्ह्यातील विकासाच्या विविध विषयांवर विचारमंथन करण्यात आले. विशेषतः जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, रोजगार, सामाजिक विकास आणि नागरिकांच्या मूलभूत गरजा याबाबत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

गडचिरोली जिल्ह्याचा मागासलेपणा दूर करून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उपलब्ध निधीचा प्रभावी व पारदर्शक वापर करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासी भागांमध्ये विकासकामांना अधिक प्राधान्य देण्याबाबतही चर्चा झाली.

बैठकीला भाजपचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

गडचिरोलीला विकसित जिल्ह्याच्या दिशेने नेण्यासाठी अशा बैठका आणि विकासाभिमुख निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular