Saturday, September 5, 2026
HomeGadchiroliगडचिरोलीच्या विकासाला मिळणार नवी दिशा; स्वतंत्र प्रादेशिक विकास मंडळ स्थापनेचा ऐतिहासिक निर्णय...

गडचिरोलीच्या विकासाला मिळणार नवी दिशा; स्वतंत्र प्रादेशिक विकास मंडळ स्थापनेचा ऐतिहासिक निर्णय…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

राज्य सरकारचे जाहीर आभार – डॉ. प्रणय खुणे,

गडचिरोली ,२२ ऑगस्ट २०२६::- गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण आणि वेगवान विकासाला चालना देण्यासाठी ‘स्वतंत्र प्रादेशिक विकास मंडळ’ स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांनी स्वागत करत राज्य सरकारचे जाहीर आभार मानले आहेत.

स्वतंत्र प्रादेशिक विकास मंडळाच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील उद्योग, पायाभूत सुविधा, रोजगारनिर्मिती तसेच दुर्गम भागातील विकासकामांना अधिक गती मिळण्याची अपेक्षा आहे. स्थानिक गरजा आणि जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीला प्राधान्य देत विकासाचा नियोजनबद्ध आराखडा राबविण्यास या मंडळामुळे मोठी मदत होणार असल्याचे डॉ. खुणे यांनी सांगितले.

गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध जिल्ह्याच्या विकासासाठी स्वतंत्र यंत्रणा उपलब्ध होणे ही निश्चितच दूरदृष्टीची बाब असून, या निर्णयामुळे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्यासोबतच पायाभूत सुविधांचा विस्तार आणि नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास हातभार लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गडचिरोलीच्या विकासासाठी सातत्याने सकारात्मक निर्णय घेणारे राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस तसेच गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. मिलिंदभाऊ नरोटे हे जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करीत असल्याबद्दल डॉ. प्रणय खुणे यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

“स्वतंत्र प्रादेशिक विकास मंडळामुळे गडचिरोलीच्या विकासाचा नवा अध्याय सुरू होणार असून, उद्योग, रोजगार, पायाभूत सुविधा आणि दुर्गम भागातील विकासाला निश्चितच वेग मिळेल. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास अधिक गतिमान होईल,” असा विश्वास डॉ. प्रणय खुणे यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular