Saturday, September 5, 2026
HomeGadchiroliमहाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न...

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

कुस्तीच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय; ‘महाराष्ट्र केसरी’सह आगामी राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे नियोजन,

गडचिरोली ,२२ ऑगस्ट २०२६ ::- महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, दि. २२ ऑगस्ट रोजी पुणे येथील हॉटेल ब्ल्यू वॉटर, पुनावळे, पिंपरी-चिंचवड येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष तथा माजी खासदार श्री. रामदासजी तडस यांच्या मार्गदर्शनाखाली या सभेचे आयोजन करण्यात आले.

सभेत मागील वार्षिक सभेच्या इतिवृत्तास मंजुरी देण्यासह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकांची कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील कुस्तीगीरांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच आगामी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील कुस्तीगीरांचा अधिकाधिक सहभाग सुनिश्चित करण्यासाठी विविध बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा, तसेच प्रतिष्ठेच्या ‘महाराष्ट्र केसरी’ आणि ‘महाराष्ट्र केसरी महिला’ किताब लढतींच्या आयोजनाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. सन २०२६-२७ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या १५, १७ व २० वर्षांखालील फ्रीस्टाईल, ग्रीकोरोमन व महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धांच्या आयोजनाचेही नियोजन करण्यात आले.

महाराष्ट्र शासनाच्या ‘मिशन लवबेध’ योजनेसह अध्यक्षांच्या परवानगीने सभेत मांडण्यात आलेल्या विविध विषयांवर चर्चा करून आवश्यक निर्णय घेण्यात आले. या निर्णयांमुळे महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्राला अधिक संघटित व व्यापक स्वरूप देण्यास मदत होणार असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.

सभेला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. संदीपभाऊ भोंडवे, सरचिटणीस श्री. योगेशजी दोडके, विदर्भ अध्यक्ष श्री. तिरतकर साहेब, गडचिरोली जिल्हाध्यक्ष तथा संचालक महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या., पुणे इंजि. प्रमोदजी पिपरे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष श्री. धर्मशिक काटकर यांच्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी व कुस्ती क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी गडचिरोली जिल्हा कुस्तीगीर संघाचे जिल्हाध्यक्ष तथा संचालक महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या., पुणे इंजि. प्रमोदजी पिपरे यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष तथा माजी खासदार श्री. रामदासजी तडस यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

कुस्तीगीरांना सक्षम व्यासपीठ देण्याचा निर्धार :-

वार्षिक सभेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कुस्तीच्या विकासाला अधिक गती देणे, नवोदित तसेच अनुभवी कुस्तीगीरांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि राज्यातील खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रभावी नियोजन करण्याचा निर्धार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी संघटनेच्या आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular