Sunday, September 6, 2026
HomeChamorshiदिना मत्स्य पालन संस्थेच्या उल्लेखनीय कार्याचा जिल्हा गौरव...

दिना मत्स्य पालन संस्थेच्या उल्लेखनीय कार्याचा जिल्हा गौरव…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

अध्यक्ष रंजन मुजुमदार यांचा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते सन्मान,

गडचिरोली /चामोर्शी,(रेगडी),२७ ऑगस्ट २०२६::- चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथील दिना जलाशयावर मत्स्य व्यवसायाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दिना उन्नयन मत्स्य पालन सहकारी संस्था, विकासपल्लीचा जिल्हा गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. जिल्हा वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष रंजन अनंत मुजुमदार यांचा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

दिना जलाशयातील मत्स्य व्यवसायाचे काम विकासपल्ली व रेगडी येथील समित्यांच्या माध्यमातून चालविले जाते. मागील अनेक वर्षांपासून मत्स्य व्यवसायाच्या क्षेत्रात सातत्यपूर्ण कामगिरी करत संस्थेने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासोबतच स्थानिक नागरिकांना रोजगार व उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्यात संस्थेचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे.

संस्थेच्या या उल्लेखनीय आणि सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत जिल्हा वर्धापन दिनानिमित्त जिल्हा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे विकासपल्ली व रेगडी परिसरातील मत्स्य व्यवसायाला नवी ओळख मिळाली असून, भविष्यात या क्षेत्राच्या विकासाला अधिक चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

यावेळी विकासपल्लीचे उपसरपंच मिहीर विश्वास, सोमनाथ वैद्य, प्रशांत शाहा, तारक हलदार यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, सभासद व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

संस्थेला मिळालेल्या या प्रतिष्ठेच्या पुरस्काराबद्दल दिना उन्नयन मत्स्य पालन सहकारी संस्थेचे पदाधिकारी, सभासद तसेच विकासपल्ली व रेगडी परिसरातील नागरिकांकडून अध्यक्ष रंजन मुजुमदार यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular