Sunday, September 6, 2026
HomeGadchiroliनेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोलीतील पर्यटकांनी तात्काळ आपत्कालीन केंद्राशी संपर्क साधावा...

नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोलीतील पर्यटकांनी तात्काळ आपत्कालीन केंद्राशी संपर्क साधावा…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

भोटे कोशी नदीच्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचे आवाहन; ऑनलाइन नोंदणीची सुविधाही उपलब्ध,

गडचिरोली ,२७ ऑगस्ट २०२६::- नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी तसेच ज्यांचा आपल्या कुटुंबीयांशी संपर्क होत नाही अशा पर्यटकांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अविश्यांत पंडा यांनी केले आहे.

नेपाळमधील पूरस्थिती लक्षात घेता तेथे असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटक व नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत जिल्हा प्रशासनाकडून माहिती संकलित केली जात आहे. पूरस्थितीमुळे कोणी पर्यटक अडकले असल्यास किंवा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क होत नसल्यास संबंधितांची माहिती प्रशासनाला तातडीने देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अडकलेल्या पर्यटकांची माहिती देताना संबंधित व्यक्तीचे पूर्ण नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण किंवा हॉटेल, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास तो द्यावा. या माहितीच्या आधारे प्रशासनाला संबंधित व्यक्तींचा शोध, माहिती संकलन आणि पुढील समन्वय साधण्यास मदत होणार आहे.

या क्रमांकांवर साधा संपर्क जिल्हा आपत्कालीन नियंत्रण कक्ष, गडचिरोली :

☎️ 07132-222031 / 222035

📱 9423911077 / 8275370208

पोलीस नियंत्रण कक्ष, गडचिरोली :

☎️ 07132-223142

ऑनलाइन नोंदणीची सुविधाही उपलब्ध

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांची माहिती महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, मंत्रालय, मुंबई यांच्याकडे नोंदविण्यासाठी ऑनलाइन सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. पर्यटक किंवा त्यांच्या नातेवाईकांनी प्रशासनाला आवश्यक माहिती देण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करावी.

ऑनलाइन नोंदणी https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/

गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून न जाता अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा. आपत्तीग्रस्त भागातील पर्यटक व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक माहिती संकलित करून संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्याचे काम प्रशासनाकडून सुरू असल्याचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular