Saturday, September 5, 2026
HomeChamorshiराष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रिय (श.पवार गट) जिल्हाध्यक्ष मा.श्री.अतुलभाऊ गण्यारपवार यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा...

राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रिय (श.पवार गट) जिल्हाध्यक्ष मा.श्री.अतुलभाऊ गण्यारपवार यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार, गडचिरोलीचे लोकप्रिय जिल्हाध्यक्ष माननिय श्री. अतुलभाऊ गण्यारपवार यांचा वाढदिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होत असून, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध ग्रामपंचायतींच्या लोकप्रतिनिधींकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

“जनसेवा हिच ईश्वर सेवा” हा विचार केंद्रस्थानी ठेवून सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेल्या अतुलभाऊ गण्यारपवार यांच्या नेतृत्वाला पक्षाच्या संघटनात्मक वाटचालीत महत्त्व प्राप्त झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असल्याचे पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येते.

या वाढदिवसानिमित्त सौ. कुंदाताई गण्यारे, सौ. रायसिडाम मॅडम, सौ. ज्योत्सना गढारे, सौ. रुपाली दहेलकर, सौ. गौराबाई गाडे आणि सौ. सपनाताई शेडमाके यांच्यासह विविध ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी अतुलभाऊ गण्यारपवार यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

“आपल्या नेतृत्वाला उत्तरोत्तर बळ मिळो, जनसेवेची वाटचाल अधिक व्यापक होवो आणि आगामी काळात समाजहितासाठी मोठे कार्य घडो,” अशा सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular