Saturday, September 5, 2026
HomeGadchiroliमहेंद्रभाऊ ब्राह्मणवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त ५१ जणांचे रक्तदान; आरोग्य तपासणीसह विविध समाजोपयोगी उपक्रम...

महेंद्रभाऊ ब्राह्मणवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त ५१ जणांचे रक्तदान; आरोग्य तपासणीसह विविध समाजोपयोगी उपक्रम उत्साहात…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

युवक, महिला व काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; सेवाभावातून वाढदिवस साजरा,

गडचिरोली, 01 ऑगस्ट 2026::-जनतेच्या विविध प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे तथा सामाजिक कार्यातून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष व युवा नेते महेंद्रभाऊ ब्राह्मणवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली येथे भव्य रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य तपासणी शिबिरासह विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सकाळपासूनच कार्यक्रमस्थळी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. शहरासह तालुक्यातील विविध भागांतून युवक, महिला, नागरिक तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. रक्तदान शिबिरात तब्बल ५१ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. विशेषतः युवकांनी मोठ्या संख्येने पुढाकार घेत रक्तदान केले.

या प्रसंगी रक्तदात्यांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे मत व्यक्त केले. ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ या संदेशातून समाजसेवेची प्रेरणा देण्यात आली.

यासोबतच आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात अनुभवी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन यासह आवश्यक आरोग्य तपासण्या करून नागरिकांना त्यांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन व वैद्यकीय सल्ला देण्यात आला.

महेंद्रभाऊ ब्राह्मणवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमामुळे वाढदिवसाला केवळ उत्सवाचे स्वरूप न देता समाजसेवेची जोड देण्याचा आदर्श निर्माण झाला, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. अशा उपक्रमांमुळे युवकांमध्ये सामाजिक कार्याची प्रेरणा निर्माण होत असून सेवाभाव, सामाजिक एकोपा आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा संदेश समाजापर्यंत पोहोचत असल्याचेही उपस्थितांनी सांगितले.

मान्यवरांची उपस्थिती :-

या कार्यक्रमाला आमदार रामदासजी मसराम, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, ॲड. दुशांत नामदेव किरसान, नगरसेवक सतीश विधाते, सौ. कुसुमताई अलाम, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, देसाईगंज अध्यक्ष राजेंद्र बुल्ले, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, धानोरा तालुकाध्यक्ष प्रशांत कोराम, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष जीवन नाट, समशेरखान पठाण, नेताजी गावतुरे, दिवाकर निसार, उत्तम ठाकरे, शरद पाटील ब्राह्मणवाडे, राजेश ठाकूर, परसराम टिकले, दिलीप घोडाम, विजय लाड, अनिल कोठारे, अब्दुल पंजवानी, सुशील शहा, प्रभाकर वासेकर, विकास जेंगठे, शंकरराव सालोटकर, मनोज आखाडे, देविदास देशमुख, श्यामभाऊ नन्नावरे, संदीप भैसारे, पंढरी चौके, आदित्य सूर्यवंशी, मयूर दोडके, स्वप्निल बेहेरे, विजय राऊत, सुधीर बांबोडे, पुरुषोत्तम चिंचोळकर, रमेश मानकर, नागोराव उईके, पांडुरंग घोटेकर, सुभाषभाऊ कोठारे, घेऊन मेश्राम, अनिल किरमे, मनोज बोरकर, मुन्ना सिंग चंदेल, माधवराव गावळ, कल्पनाताई नंदेश्वर, कविताताई उराडे, रीताताई गोवर्धन, कविताताई भगत, मीनलताई चिमूरकर, मनीषाताई खेवले, विनोद कुंभारे, सुभाष कुकुडकर, अखिल गेडाम, गिरीधर तितराम, प्रभाकर तुलावी, अनिल कोठारे, भूषण भैसारे, विलास चीजगरे, संजय बुरांडे, देवाजी काटवे, कुणाल आभारे, सुधीर चौधरी, समीर कुळे, साहिल कुळमेथे, आकाश कुंभरे, अमर नवघडे, पवन नवघरे, विजयानंद महाराज रोडे, नदीम नाथानी, रवी मेश्राम, संजय शिंपी, ज्ञानेश्वर पोरटे, हरबाजी मोरे, रमेश कोठारे, साहिल वडेट्टीवार, गौरव एनपरेडडीवार, विपुल एलटीवार, सुधीर बांबोळे, अविनाश बांबोळे, जावेद खान, लालाजी सातपुते, साहिल कुडमेथे, आकाश कुंभरे, समीर कुडे, सुधीर चौधरी, स्वप्निल मुरस्कर, अशोक नैताम, कुणाल म्हशाखेत्री, चैतन्य उईके, योगेंद्र झंजाळ, निकेश कामीडवार, श्रीनिवास ताडपल्लीवार, वामनराव सावसागडे, राहुल भांडेकर, महेंद्र लटारे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, महिला व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सेवाभावी उपक्रमातून साजरा झालेला हा वाढदिवस सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा ठरला.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular