VAINGANGA NEWS 24 / विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली, 01 ऑगस्ट 2026::-काँग्रेस कमिटी गडचिरोलीचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमास आमदार श्री. रामदासजी मसराम यांनी उपस्थिती दर्शवून ब्राह्मणवाडे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

यावेळी आमदार रामदासजी मसराम यांनी महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या उत्तम आरोग्यासह दीर्घायुष्य लाभावे, तसेच सामाजिक व सार्वजनिक जीवनातील त्यांच्या पुढील वाटचालीस यश मिळावे, अशा सदिच्छा व्यक्त केल्या.

महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात कार्यकर्ते, पदाधिकारी, मित्रपरिवार व हितचिंतकांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांनीही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

कार्यक्रमादरम्यान उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्यात आल्याने या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.
