Saturday, September 5, 2026
HomeGadchiroliसोन्या-चांदीच्या दागिन्यांची जबरी चोरीचा प्रयत्न उधळला; तिघे पोलिसांच्या ताब्यात...

सोन्या-चांदीच्या दागिन्यांची जबरी चोरीचा प्रयत्न उधळला; तिघे पोलिसांच्या ताब्यात…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गुन्हा दाखल होताच २४ तासांत गडचिरोली पोलिसांची कारवाई; चौथ्या संशयिताचा शोध सुरू,

गडचिरोली, 03 ऑगस्ट 2026::- गडचिरोली शहरात सोन्या-चांदीच्या दागिन्यांची जबरी चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा व गडचिरोली पोलीस ठाण्याच्या पथकाने गुन्हा दाखल होताच अवघ्या २४ तासांच्या आत तीन आरोपींना अटक केली. या कारवाईमुळे शहरातील व्यापारी व नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती काही प्रमाणात दूर झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री तक्रारदार सुरेश बाबूराव भोजापरे (वय ५०), व्यवसाय–ऐश्वर्या ज्वेलरी शॉप, गडचिरोली, हे दुकान बंद करून दुचाकीवरून जेवणाचा डबा घेऊन घरी जात होते. यावेळी गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील जंगल सोसायटीसमोर काही अज्ञात मोटारसायकलस्वारांनी त्यांना जबरदस्तीने अडविले. त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर मिरची पावडर फेकून, मारहाण करत त्यांच्याकडील सोन्या-चांदीचे दागिने लुटण्याचा प्रयत्न केला.

मात्र, तक्रारदाराने आरडाओरड केल्याने आरोपींनी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले. घटनेनंतर तक्रारदाराने गडचिरोली पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यावरून पोलिसांनी कलम ३०९(५), ६२ भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अपर पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा व गडचिरोली पोलीस ठाण्याची स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला.

या तपासातून गडचिरोली शहरातील संशयित आरोपी विशाल घनश्याम देशमुख (वय ३६, रा. रामनगर), राकेश विजय गिरसावके (वय ३५, रा. क्रमवार नगर) आणि शहबाज सलाम शेख (वय ३२, रा. विवेकानंद नगर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान सोनू खांडकेकर (वय २८, रा. विवेकानंद नगर, गडचिरोली) याचाही गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर आले असून त्याचा शोध सुरू आहे.

तिन्ही आरोपींना २ सप्टेंबर २०२६ रोजी अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, गुन्ह्यातील मुद्देमाल व इतर बाबींचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुळ राज जी., सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे तसेच स्थानिक गुन्हे शाखा व गडचिरोली पोलीस ठाण्याच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केली.

गडचिरोली शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असून, गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी असणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular