Saturday, September 5, 2026
HomeGadchiroliगडचिरोलीत इंडियन ओव्हरसीज बँकेची पहिली शाखा सुरू; आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या...

गडचिरोलीत इंडियन ओव्हरसीज बँकेची पहिली शाखा सुरू; आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते उद्घाटन…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

नागरिक, व्यापारी व उद्योजकांना आधुनिक बँकिंग सेवा मिळणार; जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला मिळणार नवी चालना,

गडचिरोली, 03 ऑगस्ट 2026::- गडचिरोली शहरातील झाशी राणी नगर येथे इंडियन ओव्हरसीज बँकेच्या गडचिरोली जिल्ह्यातील पहिल्याच शाखेचे उद्घाटन उत्साहात पार पडले. गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते या नव्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.

इंडियन ओव्हरसीज बँक ही देशातील महत्त्वाची राष्ट्रीयीकृत बँक असून, गडचिरोली जिल्ह्यात शाखा सुरू झाल्याने नागरिक, व्यापारी, उद्योजक तसेच विविध घटकांना आधुनिक, सुरक्षित आणि विश्वासार्ह बँकिंग सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे आर्थिक व्यवहारांना अधिक गती मिळून जिल्ह्यातील व्यापार, उद्योग आणि विविध आर्थिक उपक्रमांना चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी गडचिरोलीत इंडियन ओव्हरसीज बँकेची पहिली शाखा सुरू होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करत, या शाखेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार बँकिंग सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त केला. जिल्ह्याच्या आर्थिक प्रगतीसाठी बँकिंग क्षेत्राची भूमिका महत्त्वाची असून, नव्या शाखेमुळे नागरिकांच्या आर्थिक गरजा अधिक प्रभावीपणे पूर्ण होण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.

उद्घाटन सोहळ्यास भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. भारतजी खटी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिलजी पोहनकर, भाजपा शहर महामंत्री तथा नगर परिषद उपाध्यक्ष निखिलजी चरडे, पाणीपुरवठा सभापती लिलाधरजी भरडकर, कृषी अधिकारी प्रीतीताई हिरडकर, IOB वरिष्ठ क्षेत्रीय प्रबंधक प्रदीपकुमारजी शहा, IOB मुख्य प्रबंधक सवाईसिंगजी मीना, डॉ. किशोरजी वैद्य, डॉ. प्रीतीताई वैद्य यांच्यासह बँकेचे अधिकारी, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना अधिक सुलभ आणि आधुनिक बँकिंग सुविधा देणाऱ्या इंडियन ओव्हरसीज बँकेच्या पहिल्या शाखेचे सर्व स्तरातून स्वागत होत असून, जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला या शाखेमुळे नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular