Friday, September 11, 2026
HomeChamorshiमार्कंडा देव तीर्थक्षेत्राच्या विकासाला गती; OSD अनिरुद्ध पालकर व आशु पोहल यांची...

मार्कंडा देव तीर्थक्षेत्राच्या विकासाला गती; OSD अनिरुद्ध पालकर व आशु पोहल यांची पाहणी…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले स्वागत; मंदिर सुशोभीकरणाच्या कामाचा घेतला आढावा,

गडचिरोली /चामोर्शी, 10 सप्टेंबर 2026::-विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक मार्कंडा देव तीर्थक्षेत्राला मुख्यमंत्री यांचे OSD अनिरुद्ध पालकर तसेच वाल्मिकी समाज आयोगाचे अध्यक्ष आशु पोहल यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी मार्कंडा देव मंदिरात विधिवत पूजा-अर्चना करून दर्शन घेतले. त्यानंतर मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकास व सुशोभीकरणाच्या कामांची पाहणी करून संबंधितांकडून कामाची माहिती जाणून घेतली.

मार्कंडा देव येथे आगमन झाल्यानंतर भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी आणि भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे यांनी पुष्पगुच्छ देऊन अनिरुद्ध पालकर व आशु पोहल यांचे स्वागत केले.

यावेळी मार्कंडा देव मंदिराच्या विकासकामांसह परिसरातील सौंदर्यीकरण, भाविकांसाठी आवश्यक सुविधा आणि तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास याबाबत चर्चा करण्यात आली. ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व लाभलेल्या या तीर्थक्षेत्राचा विकास अधिक नियोजनबद्ध आणि प्रभावी पद्धतीने करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला.

मार्कंडा देव हे गडचिरोली जिल्ह्यातील महत्त्वाचे धार्मिक व पर्यटनस्थळ असून, येथे दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक भेट देतात. त्यामुळे मंदिर परिसरातील विकासकामे आणि सुशोभीकरणाच्या माध्यमातून भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर यावेळी भर देण्यात आला.

याप्रसंगी OBC आघाडीचे भास्कर बुरे, दिलीप चलाख, जयराम चलाख, शेषराव कोहळे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular