Monday, September 21, 2026
HomeBrahmapuriगणेशोत्सवात सेवाभावाचा जागर! ब्रम्हपुरी भाजप कार्यालयात रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद...

गणेशोत्सवात सेवाभावाचा जागर! ब्रम्हपुरी भाजप कार्यालयात रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांच्या हस्ते रक्तदात्यांचा गौरव; गणरायाचे विधिवत पूजन करून समाजकल्याणासाठी प्रार्थना,

ब्रम्हपुरी, २० सप्टेंबर २०२६ : गणेशोत्सवाच्या भक्तिमय वातावरणात सामाजिक बांधिलकी जपत ब्रम्हपुरी येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या या अभियानाच्या माध्यमातून सामाजिक सेवेचा संदेश देण्यात आला. या उपक्रमाला रक्तदात्यांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

ब्रम्हपुरी भाजपा कार्यालयात अनेक वर्षांपासून गणेशोत्सवाची परंपरा अखंडपणे सुरू असून, यंदाही गणेशोत्सवानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक उत्तरदायित्व जपण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या शिबिराला माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी रक्तदात्यांचे कौतुक करून त्यांच्या सामाजिक योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. रक्तदान करणाऱ्या नागरिकांना त्यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

सुशील खारकर, प्रशांत वसाके, बंटीभाऊ येल्लावार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा सहभाग :-

रक्तदान शिबिरात सुशील खारकर, प्रशांत वसाके, बंटीभाऊ येल्लावार तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी सहभाग नोंदविला. माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. त्यांच्या सहभागामुळे शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

रक्तदान हे गरजू रुग्णांना जीवनदान देणारे महत्त्वपूर्ण सामाजिक कार्य असून, अशा उपक्रमांमधून समाजात मानवता, सेवाभाव आणि सामाजिक जाणीव अधिक दृढ होते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून रक्तदानाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आले.

गणरायाचे मनोभावे दर्शन व विधिवत पूजन :-

रक्तदान शिबिराला भेट दिल्यानंतर डॉ. अशोकजी नेते यांनी भाजपा कार्यालयात विराजमान असलेल्या श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणरायाचे विधिवत पूजन करून सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी आणि समाजाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.

या प्रसंगी भाजयुमो जिल्हाध्यक्ष तनय देशकर, शहराध्यक्ष डॉ. सुयोग बाळबुद्धे, नगरसेवक मनोज भुपाल, जिल्हा उपाध्यक्ष साकेत भानारकर, माजी नगरसेवक तथा ज्येष्ठ नेते मनोज वठ्ठे, माजी शहराध्यक्ष अरविंद नांदुरकर, तालुका महामंत्री स्वप्नील अलगदेवे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गणेशोत्सवाच्या धार्मिक परंपरेला सामाजिक सेवेची जोड देत आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरामुळे ब्रम्हपुरी भाजपा कार्यालयातील उत्सवात सेवाभाव आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा संदेश अधोरेखित झाला.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular