Monday, September 21, 2026
HomeGadchiroliनगराध्यक्षा ॲड. प्रणोती निंबोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाचा उत्साह शिगेला...

नगराध्यक्षा ॲड. प्रणोती निंबोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाचा उत्साह शिगेला…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

 भगवती राईस मिलमध्ये शुभेच्छांसाठी कार्यकर्त्यांची मांदियाळी,

आमदार बंटी भांगडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य सोहळा; शहरात विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन,

गडचिरोली, 20 सप्टेंबर 2026::- गडचिरोली नगर परिषदेच्या नगराध्यक्षा ॲड. प्रणोती सागर निंबोरकर यांचा वाढदिवस भारतीय जनता पार्टी गडचिरोली जिल्हा व शहराच्या वतीने मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. भगवती राईस मिल येथे आयोजित करण्यात आलेल्या या भव्य सोहळ्याला चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा भाजपा गडचिरोली जिल्हा प्रभारी कीर्तिकुमार (बंटी) भांगडिया यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी भाजपाचे जिल्हा व शहरातील पदाधिकारी, नगरसेवक-नगरसेविका आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 भगवती राईस मिलमध्ये शुभेच्छांचा वर्षाव :-

नगराध्यक्षा ॲड. प्रणोती निंबोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भगवती राईस मिल परिसरात सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्हा आणि शहराच्या विविध भागांतून आलेल्या भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमुळे संपूर्ण परिसर उत्साहाने भारावून गेला होता.

यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. उपस्थित लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन ॲड. प्रणोती निंबोरकर यांना शुभेच्छा दिल्या. त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि आगामी वाटचालीस यश लाभावे, अशा सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

 भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती :-

या वाढदिवस सोहळ्याला आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडिया, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे, रेखाताई डोंळस, नगर परिषद बांधकाम सभापती अनिल कुनघाडकर, नगर परिषद उपाध्यक्ष निखिल चरडे यांच्यासह भाजपा जिल्हा व शहरातील विविध पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच नगर परिषदेचे विविध सभापती, नगरसेवक-नगरसेविका आणि पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

स्नेहपूर्ण वातावरणात वाढदिवसाचा जल्लोष :-

वाढदिवसानिमित्त भाजपा संघटनेतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नगर परिषदेतील लोकप्रतिनिधी एकत्र आल्याने कार्यक्रमाला भव्य स्वरूप प्राप्त झाले. उपस्थितांनी नगराध्यक्षा ॲड. प्रणोती निंबोरकर यांच्याशी स्नेहपूर्ण संवाद साधत त्यांना शुभेच्छा दिल्या.

जिल्हा व शहर भाजपाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीमुळे वाढदिवस सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विविध स्तरांतील कार्यकर्त्यांनी एकत्र येत नगराध्यक्षांना शुभेच्छा दिल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचे आयोजन :-

नगराध्यक्षा ॲड. प्रणोती सागर निंबोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा शहराच्या वतीने गडचिरोली शहरातील विविध भागांत सेवाभावी उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले. नागरिकांच्या हिताचे विविध उपक्रम राबवून वाढदिवसाला सामाजिक सेवेची जोड देण्यात आली.

एकीकडे भगवती राईस मिल येथे भाजपाच्या जिल्हा व शहर पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वाढदिवसाचा जल्लोष, तर दुसरीकडे शहराच्या विविध भागांत सेवाभावी उपक्रम, अशा दुहेरी स्वरूपात नगराध्यक्षा ॲड. प्रणोती सागर निंबोरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular