Saturday, May 23, 2026
HomeAheriमाजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी मृत इसमाचा शव स्वगावी नेण्यास वाहन...

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी मृत इसमाचा शव स्वगावी नेण्यास वाहन उपलब्ध करून देऊन केली आर्थिक मदत…

VAINGANGA NEWS 24 (विशेष प्रतिनिधी)

अहेरी,१२ ऑक्टोंबर २०२३ ::- अहेरी तालुक्यातील किष्टापुर (दोडगिर) येथील रहिवासी बोक्की किष्टा मडावी वय ५४ वर्षे आपल्या शेतात पिकाला औषधी फवारणी करतांना अचानक पणे त्याचा नाकात औषधी गेल्याने ते आपल्या शेतात बेशुद्ध अवस्थेत पडले.पुढील उपचारासाठी तात्काळ अहेरी येथे ग्रामीण रुग्णालय दाखल केले परंतु उपचार सुरू असताना त्यांना आपला प्राण गमवावा लागला. त्यांची घरची परिस्थिती हलाखीची असल्याने शव घेऊन जाण्यासाठी त्यांना आर्थिक मदतची अत्यंत गरज होती. सदर विषय भाजपचे विकास तोडसाम,विनोद जिल्लेवार यांच्याद्वारे मा.राजे अम्ब्रिशराव महाराज यांना कळताच क्षणाचा विलंब न करता शव स्वगावी नेण्यासाठी अहेरी नगरपंचायत येथील स्वर्गरथ या वाहनात डिजल टाकून वाहन उपलब्ध करून दिली. यावेळी त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतही केली.

यावेळी उपस्थित भाजपचे विकास तोडसाम,विनोद जिल्लेवार,साई मुडपल्लीवर,सारंग रामगिरीवार,आदी होते

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular