Saturday, November 14, 2026
HomeChamorshiपाविमुरांडा येथे प्रशासनाचा थेट जनतेच्या दारी उपक्रम; आदिम जमातींना शासकीय योजनांचा लाभ...

पाविमुरांडा येथे प्रशासनाचा थेट जनतेच्या दारी उपक्रम; आदिम जमातींना शासकीय योजनांचा लाभ…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

विशेष सेवा शिबिरातून ३३ कुटुंबांचे सर्वेक्षण; विविध विभागांच्या माध्यमातून प्रलंबित कामांचा जागीच निपटारा,

गडचिरोली /चामोर्शी, 13 नोव्हेंबर 2026 :-दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील आदिम जमातींच्या नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी पंचायत समिती चामोर्शीच्या वतीने पाविमुरांडा येथे प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानांतर्गत विशेष सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले. शुक्रवार, १३ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या या शिबिराच्या माध्यमातून विविध शासकीय विभागांच्या सेवा नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आल्या. तसेच नागरिकांच्या प्रलंबित कामांचा निपटारा करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला.

ग्रामपंचायत पाविमुरांडा अंतर्गत लेनगुडा येथील १२ आणि पुसूर येथील २१ अशा एकूण ३३ कुटुंबांचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणादरम्यान विविध शासकीय योजनांचा लाभ घेताना नागरिकांना येणाऱ्या अडचणी आणि त्रुटी निदर्शनास आल्या होत्या. या त्रुटींची प्रत्यक्ष पडताळणी करून पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करून देणे आणि प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करणे, हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता.

एकाच छताखाली विविध विभागांच्या सेवा :-

या शिबिरात पंचायत समिती, तहसील कार्यालय, आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग, उमेद अभियान, भारतीय पोस्ट विभाग, गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, महावितरण, आधार केंद्र आणि ग्रामपंचायत पाविमुरांडा येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. विविध विभागांच्या समन्वयातून नागरिकांना एकाच छताखाली शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या.

विविध दाखले व योजनांचा लाभ :-

शिबिरादरम्यान ६३ व्यक्तींची सिकलसेल तपासणी करण्यात आली, तर २४ नवीन गोल्डन कार्ड तयार करण्यात आले. याशिवाय १९ जुन्या गोल्डन कार्डचे डाउनलोड करण्यात आले. चार नवीन बँक खाती उघडण्यात आली. विमा योजनांसाठी ३१ नोंदणी, प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची तीन प्रकरणे, सहा जातीचे दाखले, नऊ उत्पन्नाचे दाखले, १८ आधार अपडेट आणि एक नवीन आधार नोंदणी करण्यात आली.

तसेच वीजजोडणीसाठी १३ अर्ज, किसान क्रेडिट कार्डसंबंधी दोन खात्यांची कार्यवाही आणि तलाठी स्तरावर २५ उत्पन्न दाखल्यांची कार्यवाही करण्यात आली. त्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांना विविध शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजविण्याऐवजी एकाच ठिकाणी अनेक सेवांचा लाभ मिळाला.

या विशेष सेवा शिबिरामुळे आदिम जमातींच्या नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन आणि विविध विभागांमध्ये समन्वय साधला गेला. दुर्गम भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या प्रत्यक्ष सोडविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular