VAINGANGA NEWS 24 (विशेष प्रतिनिधी)
रुग्णांची विचारपूस करीत रुग्णालयीन आरोग्य विषयक समस्यांबाबत घेतला आढावा.
मुलचेरा, १७ ऑक्टोंबर २०२३ ::- गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी अहेरी विधानसभा क्षेत्रातील मुलचेरा तालुक्याच्या प्रवासात ग्रामीण रुग्णालयास भेट दिली.
यावेळी त्यांनी ग्रामीण रुग्णालयात असलेल्या आरोग्यविषयक व्यवस्थेचा आढावा घेत तेथील समस्या ही जाणून घेतल्या त्याचबरोबर रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांची वार्तालाप करून त्यांची आस्थेने विचारपूस केली.
यावेळी मुलचेरा तालुका अध्यक्ष संजीव सरकार,भाजपा जिल्हा सचिव दिलीपजी चलाख, प्रकाश दत्ता, सुभाष गणपती, साईनाथजी बुरांडे ,युवा नेते प्रतीक राठी, रामचंद्र वरवाडे दीपकजी वासेकर यांचे सह ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
