VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी
आरमोरी ,२३ ऑक्टोंबर २०२३ ::- आरमोरी तालुक्यात मागील पंधरा दिवसात धुमाकूळ घालणारी वाघीण वनविभागाला अखेर आज जेरबंद करण्यात यश आले.त्या वाघीणीने मागच्या आठवठ्यात एका शेतात धानाची कापणी करणाऱ्या महिलेचा बळी घेतला होता.
वाघीणीला पकडण्यासाठी वन विभाग टीम मागील पंधरा दिवसापासून अथक परिश्रम करत होते.
पण आज अखेर त्याला यश आले. झुडपी जंगल दाट असल्याने वनविभागाला पंधरा दिवसापासून जेरबंद करण्यासाठी वाघीण हुलकावणी देत होती.
वडसा विभागाचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू टीमने ही कारवाई पार पाडली. आज सकाळी ९ वाजता त्या वाघीनीला आरमोरी तालुक्याच्या रवी बीटातील मुलूर चक परिसरात जेरबंद करण्यात यश आले.

