VSINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी
गडचिरोली, २४ नोव्हेंबर २०२३ ::- रोजी मौजा गिलगांव ता. जि. गडचिरोली येथे मित्रपरिवार क्रीडा व सांस्कृतिक कला मंडळ गिलगांव च्या वतीने आयोजित भव्य खुली कबड्डी स्पर्धाचे उद्घाटन शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या हस्ते व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली-चिमूर लोकसभा समन्वयक डॉ. नामदेव किरसान यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. किरसान यांनी खेळांमुळे खेळाडू वृत्ती जागृत होऊन सलोख्याचे वातावरण निर्माण करता येते. परंतु सध्याच्या सरकारने खेळांच्या सोयीसुविधा होतकरू खेळाडूंना पुरविण्याऐवजी खेळाची मैदानं व स्टेडियम खाजगी लोकांना देण्याच्या निर्णय घेतलेला आहे.
या खाजगीकरणामुळे गरीब खेळाडूंना खेळाच्या योग्य सोयीपासून वंचित ठेवण्याचे काम सरकार करीत आहे. सार्वजनिक उपक्रमाच्या खाजगीकरणाचा सपाटा या सरकारने चालविलेला असल्यामुळे व शासकीय कार्यालयातील पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याच्या निर्णय घेतल्यामुळे सरकारी नोकऱ्या संपुष्टात आणण्याचे काम हे सरकार करीत आहे. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली असतांना रोजगाराच्या संधी हिरावून घेण्याचे काम सरकार करीत आहे. करिता युवकांनी वर्तमान घडामोडींची जाणीव ठेवून सरकार निवडतांना या बाबी विचारात घेऊन योग्य सरकारची निवड करावी असे आव्हान त्यांनी केले.
यावेळी सह उद्घाटक प्रदेश युवक काँग्रेस महासचिव विश्वजीत कोवासे, माजी पंचायत समिती सदस्य रामरतनजी गोहने, डॉ. जगदीश पाटील मुनघाटे, सरपंच अशोकजी कुळमेथे, जिल्हा काँग्रेस महासचिव हरबाजी मोरे, संदीपजी बानबले, दिपकजी लाडे, माजी पोलीस पाटील आवारीजी, दीपकजी सिडाम, गणमान्य मंडळी व प्रेक्षक उपस्थित होते.
