Tuesday, September 15, 2026
HomeGadchiroliखेळांमुळे शारीरिक विकास सोबत मानसिक आरोग्य तितकेच महत्वाचे - ऍड. विश्वजीत कोवासे...

खेळांमुळे शारीरिक विकास सोबत मानसिक आरोग्य तितकेच महत्वाचे – ऍड. विश्वजीत कोवासे…

VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी 

 गडचिरोली, २४ नोव्हेंबर २०२३ ::- रोजी मौजा गिलगांव ता. जि. गडचिरोली येथे मित्रपरिवार क्रीडा व सांस्कृतिक कला मंडळ गिलगांव च्या वतीने आयोजित भव्य खुली कबड्डी स्पर्धाचे उद्घाटन शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार, कार्यक्रमाचे सहउदघाटक महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव, ऍड. विश्वजीत कोवासे यांच्या उपस्थित पार पडले. यावेळी आपल्या भाषणात ऍड. विश्वजीत कोवासे यांनी खेळांमुळे खेळाडू वृत्ती जागृत होऊन मानसिक दृष्ट्या प्रघल्भ होते. परंतु सध्याच्या सरकारच्या धोरणामुळे युवकांमध्ये निराशेचे वातावरण खनिर्माण झाले आहे. मोठ्या प्रमाणात महागाई, बेरोजगारी, बेकारी पसरत चालली आहे. कंत्राटीकरण व खासगीकरणामुळे युवकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. शिक्षण सअसून सुद्धा रोजगार मिळत नाही, शेतकरी बेहाल झाला आहे, त्याच्या उत्पन्नाला हमी भाव नाही, उत्पादण खर्च वाढला पण शेतमालाला पाहिजे तितका भाव मिळत नसून शेतकरी हवालदिल झाला आहे. विद्यमान सरकार खेळळुंना सोयीसुविधा पुरावून होतकरू खेळाडूंना प्रोत्साहण देण्याऐवजी खेळाची मैदानं व स्टेडियम खाजगी लोकांना देण्याच्या निर्णय घेतलेला आहे. या खाजगीकरणामुळे गरीब खेळाडूंना खेळाच्या योग्य सोयीपासून वंचित ठेवण्याचे काम सरकार करीत आहे. सार्वजनिक उपक्रमाच्या खाजगीकरणाचा सपाटा या सरकारने चालविलेला असल्यामुळे व शासकीय कार्यालयातील पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याच्या निर्णय घेतल्यामुळे सरकारी नोकऱ्या संपुष्टात आणण्याचे काम हे सरकार करीत आहे. या सगळ्या घळामोळी ची जाणीव ठेवून युवकांनी सरकार निवडतांना या बाबी विचारात नवीन पात्र युवकांची नोंदणी मतदार यादीत करून मतदानाचा अधिकार बजवावा व योग्य सरकारची निवड करावी असे आव्हान कोवासेंनी केले.             यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान, माजी पंचायत समिती सदस्य रामरतनजी गोहने, डॉ. जगदीश पाटील मुनघाटे, सरपंच अशोकजी कुळमेथे, जिल्हा काँग्रेस महासचिव हरबाजी मोरे, संदीपजी बानबले, दिपकजी लाडे, माजी पोलीस पाटील आवारीजी, दीपकजी सिडाम, गणमान्य मंडळी व प्रेक्षक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular