VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी
दारू वाहतुकीसाठी आरोपीची लढवलेली शक्कल पोलीसांनी केली उघड.
गडचिरोली , २७ नोव्हेंबर २०२३ ::- गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी अवैध दारु विक्रीवर अंकुश लावण्याबाबत दिलेल्या आदेशान्वये कल २५ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ०६ या. एक पिकप नंचर एम. एच. ३४ बि. होड. ३१५७ या वाहनातुन अवैधरित्या दारु विक्री होत असल्याची गोपनिय माहिती मिळाली असल्याने पोस्टे मुलचेरा येथील अधिकारी अंमलदार यांनी नाकाबंदी करुन ये-जा करणाऱ्या वाहनास थांबवुन सदर वाहनाची तपासणी केली असता व वाहनाचे डाल्यामधील काही भाग हा वेल्डिंग करुन त्याच्या आतमध्ये काही बॉक्स ठेवलेले दिसुन आले तसेच सदर वाहनाची पाहणी केली असता सदर बॉक्समध्ये देशी व विदेशी दारु मिळून आले.
सदर तपासणी दरम्यान १) रॅकेट देशी दारु प्रवरा डिस्टिलरी कंपनीचे ३१ बॉक्स प्रति मध्ये ९० एम. एल. मापाचे १०० निपा असे एकुण ३ हजार १००, प्रतिनग ७० रुपये प्रमाणे, किंमत २ लाख १७ हजार रुपये, २) इम्पेरियल ब्ल्यू कंपनीचे ०४ बॉक्स प्रति बॉक्स मध्ये ७५० एम.एल. मापाच्या १२ बॉटल असे एकूण ४८ बॉटल प्रति बॉटल विक्री किंमत १ हजार ४०० रुपये प्रमाणे किंमत ६७ हजार २०० रुपये, ३) हायवर्ड ५ हजार बियर कंपनीचे तीन बॉक्स प्रति बॉक्स मध्ये ५०० एम.एल. मापाच्या २४ कॅन एकूण ७२ कॅन प्रति विक्री किंमत ३५० रुपये प्रमाणे २५ हजार २०० रुपये, ४) टुबर्ग स्ट्रॉग बियर कंपनीचे दोन बॉक्स प्रति बॉक्स मध्ये ५०० एम.एल. मापाच्या २४ कॅन असे एकूण ४८ कॅन प्रति कॅन विक्री किंमत ३५० रुपये प्रमाणे किंमत १६ हजार ८०० रुपये, ५) एक टाटा योध्दा १ हजार ७०० कंपनीचे चार चाकी चाहन क्रमांक एम. एच. ३४ बी. रेड. ३१५७ किंमत अंदाजे ४ लाख ५० हजार रुपये असा एकुण अंदाजे ७ लाख ७६ हजार २०० रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच सदर आहे. फरार आरोपी अरविंद निवेलकर रा. जंगम वस्ती चंद्रपुर ह.मु. घोट ता. चामोशी जि. गडचिरोली येथील असुन फरार आरोपीचे शोध घेणे सुरु आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे मूलचेरा येथील पोउपनि संदिप ठाकरे हे करीत आहेत.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) एम. रमेश व उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी सुदर्शन राठोड यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे मुलचेरा प्रभारी अधिकारी सपोनि. अशोक भापकर व पोलीस अंमलदार यांनी पार पाडली.
तसेच यावेळी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले की, गडचिरोली पोलीस दल हे आरोपीच्या नेहमीच एक पाऊल पुढे चालत आहे. सदर वेळी आरोपीने खूप शक्कल लढवुन पोलीसांच्या डोळ्यात धुळ फेकण्याचा प्रयत्न केला. परंतु गडचिरोली पोलीस दलाने त्यांचा तो प्रयत्न हाणून पाडला आहे. तसेच जिल्ह्यातील नागरीकांना आवाहन केले की, जिल्ह्यात कुठेही अशा पद्धतीने होत असलेल्या अवैध दारु अथवा तत्सम अंमली पदार्थाच्या वाहतुकीबद्दल माहिती मिळताच गडचिरोली पोलीस दलाशी संपर्क साधावा.
