VAINGANGA NEWS 24
प्रतिनिधी – महेंद्र सुल्वावार
एटापल्ली, २९ नोव्हेंबर २०२३ ::- रोज बुधवारला नगरपंचायत एटापल्ली तर्फे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत *”आयुष्यमान कार्ड”* काढणे सुरू होत आहे तरी नगरपंचायत एटापल्ली क्षेत्रातील सर्व नागरिकांनी नगरपंचायत कार्यालयात भेट द्यावे.
आवश्यक कागदपत्रे
१)आधार कार्ड ,आयुष्यमान भारत कार्डचे फायदे.
◆ हे आयुष्यमान कार्ड तुम्हाला आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना-महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत भारतातील कोणत्याही अंगीकृत रुग्णालया मध्ये तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सामूहिकरीत्या वार्षिक ५ (पाच) लाख रुपयापर्यंतचा मोफत वैदकीय सुविधांचा लाभ मिळवून देण्यास मदत करेल.
◆आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना-महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या अंगीकृत रुग्णालयांमध्ये कोणतीही रक्कम जमा करण्याची आवश्यकता नाही.
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण योजना २०२३-२४ अंतर्गत.
जाहीर सूचना
नवीन मतदान कार्ड.
नगरपंचायत कार्यालय एटापल्ली तर्फे सर्व 18 वर्षा वरील युवक-युवती यांना कळविण्यात येत आहे की नगरपंचायत कार्यालयात *नवीन मतदान कार्ड* काढणे सुरू आहे तरी सर्व युवक-युवतींनी नगरपंचायत कार्यालयात भेट द्यावे.
आवश्यक कागदपत्रे.
◆आधार कार्ड
◆2 पास फोटो
◆रहिवासी दाखला
◆जन्म दाखला किंवा TC.
आपले नम्र दिपयंती पेंदाम
नगराध्यक्ष न.पं. एटापल्ली
अधिक माहिती करिता संपर्क राघव सुल्वावार
बांधकाम सभापती न.पं. एटापल्ली
राहुल कुळमेथे नगरसेवक न.पं. एटापल्ली
निजान पेंदाम नगरसेवक न.पं.एटापल्ली
