Wednesday, September 16, 2026
HomeChamorshiजिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल )येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव...

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल )येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन…

VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी  

चामोर्शी, ०६ डिसेंबर २०२३ ::- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल) येथे 6 डिसेंबर 2023 रोज बुधवार ला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा माल येथील पदवीधर शिक्षक रघुनाथ भांडेकर सर,सहायक शिक्षक अशोक जुवारे सर,जगदीश कळाम सर, राजकुमार कुळसंगे सर,चंद्रकांत वेटे सर,कमलाकर कोंडावार सर तसेच शाळेतील असंख्य विद्यार्थी यांचे प्रमुख उपस्थितीत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करुन व पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.       महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष तथा पदवीधर शिक्षक रघुनाथ भांडेकर सर,सहायक शिक्षक अशोक जुवारे सर,राजकुमार कुळसंगे सर यांनी आपल्या भाषणातुन मार्गदर्शन केले.तसेच महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने इयत्ता 5वी,6वी,7वी तील काही विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनकार्यावर भाषणे दिली. आजच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष तथा पदवीधर शिक्षक रघुनाथ भांडेकर सर होते.प्रमुख अतिथी म्हणून अशोक जुवारे सर,जगदीश कळाम सर,राजकुमार कुळसंगे सर,चंद्रकांत वेटे सर,कमलाकर कोंडावार सर आदी मान्यवर लाभले होते. सर्वप्रथम उपस्थित प्रमुख मान्यवरांचे हस्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले.

         कोतदनंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रघुनाथ भांडेकर सर यांनी आपल्या मार्गदर्शनातुन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनकार्याची ओळख उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना करून दिली.आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन जगदीश कळाम सर यांनी केले.कार्यकमाचे शेवटी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना गोड खाऊचे वाटप करण्यात आले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular