Sunday, September 13, 2026
HomeAheriयुवकांना नौकरीची तर आम्हाला युवकांची चिंता,,माजी जि. प.अध्यक्षा भाग्यश्री ताई आत्राम यांचे...

युवकांना नौकरीची तर आम्हाला युवकांची चिंता,,माजी जि. प.अध्यक्षा भाग्यश्री ताई आत्राम यांचे प्रतिपादन…

VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी 

आलापल्लीत सुशिक्षित बेरोजगार युवकांचे मेळावा.

अहेरी, १६ डिसेंबर २०२३ ::- युवकांना रोजगार व नौकरीची चिंता तर आम्हाला युवकांची चिंता असते आणि ही चिंता दूर करण्यासाठी आमचे प्रामाणिक प्रयत्न व ध्येय असून त्यासाठी आमची धडपड सुरू असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम यांनी केले.   त्या शुक्रवारी अहेरी नजीकच्या आलापल्ली येथील क्रीडा संकुल येथे सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या सुरक्षा रक्षक पदाच्या परमनंट मेगा भरतीच्या कार्यक्रमात अध्यक्षीय स्थानावरून बोलत होत्या.     यावेळी मंचावर प्रामुख्याने आलापल्ली ग्राम पंचायतीचे उपसरपंच विनोद आकनपल्लीवार, ग्राम पंचायत सदस्य पुष्पाताई अलोणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, नागेपली ग्रा.पं.चे उपसरपंच मलरेडी येमनुरवार, रतन दुर्गे, श्रीकांत मद्दीवाऱ सोमेश्वर रामटेके, मनोज बोल्लुवार, कैलास कोरेत, प्रीती इश्टाम, अनुसया सपिडवार, संतोष अर्का, गीता दुर्गे, सुचिता खोब्रागडे, नगर सेवक अमोल मुक्कावार, श्रीनिवास विरगोनवार , वासुदेव पेद्दीवार आदी मान्यवर उपस्थित होते.     पुढे अध्यक्षीय स्थानावरून बोलताना जि.प.चे माजी अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम म्हणाले की, युवक हेच देशाचे खरे आधारस्तंभ असून युवकांच्या हाताला काम व नौकरी प्राप्त झाली की युवकांचे स्वतःचे, कुटुंबाचे, समाजाचे व गावाचे विकास होण्यासाठी चालना मिळते, तसेच कायमस्वरूपी आनंदाचे वातावरण निर्माण होते असे म्हणत भाग्यश्री ताई आत्राम यांनी सुरक्षा रक्षक पदाच्या परमनंट मेगा भरतीचे लाभ घेण्याचे आवाहन करून विविध उदाहरणासहीत युवकांना सुरक्षा रक्षक नौकर भरतीचे महत्त्व पटवून दिले आणि मोलाचे मार्गदर्शन केले.     तत्पूर्वी आलापल्ली ग्राम पंचायतीच्या वतीने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षा भाग्यश्री ताई आत्राम यांचे आणि सुरक्षा रक्षक भरती अधिकारी गोरख जगताप यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आले.    कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुष्पाताई अलोणे यांनी तर सूत्रसंचालन सुरेंद्र अलोणे यांनी केले, उपस्थितांचे आभार स्वप्नील श्रीरामवार यांनी मानले. यावेळी युवक बहुसंख्येने उपस्थित होते.

    विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम यांच्या विशेष प्रयत्नातून 15 ते 20 डिसेंबर क्रीडा संकुल आलापल्ली येथे तर 21 ते 22 डिसेंबर क्रीडा संकुल सिरोंचा येथे सुरक्षा रक्षक पदाचे परमनंट भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular