Saturday, June 6, 2026
HomeMulchera''जय माँ दुर्गा क्रिकेट क्लब देशबंधुग्राम'' द्वारे आयोजित भव्य रबरी बॉल क्रिकेट...

”जय माँ दुर्गा क्रिकेट क्लब देशबंधुग्राम” द्वारे आयोजित भव्य रबरी बॉल क्रिकेट सामन्याच बक्षीस वितरण संपन्न…

VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी 

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या कडून भव्य रबरी बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी 25001-/रु प्रथम पुरस्कार.

मुलचेरा, १६ डिसेंबर २०२३ ::- तालुक्यातील विवेकानंदपूर ग्रामपंचायत अंतर्गत देशबंधुग्राम येथे माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्याने ‘जय माँ दुर्गा क्रिकेट क्लब देशबंधुग्राम” यांच्या सौजन्याने भव्य रबरी बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भाजपचे जिल्हा सचिव तथा ग्रामपंचायत सदस्य श्री.बादल शाह हे होते. त्यावेळी गावकऱ्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा तालुका अध्यक्ष श्री.संजीव सरकार, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश दत्ता,तालुका महामंत्री सुभाष गणपती, ग्रामपंचायत सदस्य सुखरंज सरकार, राम सुंदर बाला,जीवन सरकार,तरुण बिश्वास,मोहन सरकार हे होते.यावेळी मोठ्या संख्येने स्पर्धकांनी या भव्य रबरी बॉल क्रिकेट स्पर्धेला हजरी लावली होती.

या भव्य रबरी बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी प्रथम पुरस्कार 25001-/रु पुरस्कार माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या कडून तर द्वितीय पुरस्कार 15001-/रु भाजपचे जिल्हा सचिव तथा ग्रामपंचायत सदस्य श्री.बादल शाह यांच्या तर्फे देण्यात आले आणि तृतीय पुरस्कार 10001-/ किरण सरकार व निरंजन सरकार यांच्या कडून देण्यात आला.यावेळी मोठ्या उत्साहात स्पर्धा पाहण्यासाठी देशबंधुग्राम येथील गावकरी,युवा वर्ग आणि महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular