VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी
आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या विनंतीवरून गोंडवाना विद्यापीठा संदर्भात विधानभवनात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न
पुरेसा निधी उपलब्ध करून देणार तसेच रिक्त पदभरती संदर्भातही लवकरच निर्णय होणार मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे सकारात्मक आश्वासन.
नागपूर, १९ डिसेंबर २०२३ ::- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या इमारतीचे भूमिपूजन महामहिम राष्ट्रपती यांचे हस्ते होऊन बरेच दिवस झाले परंतु अजून इमारतीचे बांधकाम सुरू झाले नाही. त्यामुळे इमारतीच्या डिझाईनला तातडीनं मंजुरी देऊन विद्यापीठाच्या इमारतीचे बांधकाम लवकरच लवकर सुरू करावे व विद्यापीठातील रिक्त पदांबाबत तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या संदर्भात विधानभवनात झालेल्या बैठकीमध्ये राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे केली.
या संदर्भातील प्रस्ताव तातडीने मागून घेत आवश्यक निधी उपलब्ध करून देणार तसेच रिक्त पदभरती संदर्भातही लवकरच निर्णय घेणार असे आश्वासन मंत्री ना . चंद्रकांत दादा पाटील यांनी दिले.
आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या विनंतीवरून गोंडवाना विद्यापीठा संदर्भात विधानभवनात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी बैठकीचे आयोजन केले.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रमूख उपस्थितीत झालेल्या या बैठकीला आमदार डॉक्टर देवरावजी होळी , उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांतजी बोकारे , संचालक उच्चवतंत्र शिक्षण पुणे, विद्यापीठाचे कुलसचिव , यांचे सह गोंडवाना विद्यापीठ व संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
