Wednesday, September 16, 2026
HomeMulcheraमाजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्याने "मासुम धन्वंतरी माता व्हॉलीबॉल क्लब...

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्याने “मासुम धन्वंतरी माता व्हॉलीबॉल क्लब कोलपल्ली” द्वारे आयोजित भव्य व्हॉलीबॉल सामन्याच उदघाटन संपन्न…

VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी 

मुलचेरा, २८ डिसेंबर २०२३ ::- तालुक्यातील कोठारी ग्रामपंचायत अंतर्गत कोलपल्ली येथे माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्याने ‘मासुम धन्वंतरी माता व्हॉलीबॉल क्लब कोलपल्ली ”यांच्या सौजन्याने भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचे उदघाटक म्हणून श्री.माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे जिल्हा परिषद गडचिरोली हे होते.तर या कार्यक्रमाचे सहउदघाटक म्हणून श्री.संतोषभाऊ उरेते सामाजिक कार्यकर्ते अहेरी हे होते.त्यावेळी गावकऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केले.

     कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री.बासू मुजुमदार उपसभापती पंचायत समिती मूलचेरा,प्रमुख पाहुणे म्हणून भाजप तालुका अध्यक्ष संजीव सरकार,भाजपा तालुका महामंत्री मारोती पेंदाम,माजी पंचायत समिती सदस्य सुभाष गणपती,भाजपा महामंत्री विजय बिश्वास,प्रतिष्ठित नागरिक सुरेश कुसनाके,दिलीप सिडाम सर,वैष्णव ठाकूर,अर्जुन आत्राम,महादेव चौधरी,शामराव पोरतेट,कवडू चौधरी हे होते.तसेच उद्घाटन सोहळ्या दरम्यान लहान मुलींनी सुंदर रेला नृत्य सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढविली.

यावेळी मोठ्या संख्येने स्पर्धकांनी या भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेला हजरी लावली होती.

      या भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी प्रथम पुरस्कार 31001-/रु पुरस्कार माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या कडून तर द्वितीय पुरस्कार 21001-/रु माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांच्या तर्फे देण्यात आले आणि तृतीय पुरस्कार 11001-/ रु माजी समाजकल्याण सभापती सौ.माधुरीताई संतोष उरेते यांच्या कडून देण्यात आला.

   यावेळी मोठ्या उत्साहात स्पर्धा पाहण्यासाठी कोलपल्ली येथील गावकरी,युवा वर्ग आणि महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular