Saturday, May 23, 2026
HomeAheriअहेरी पोलिसांनी पकडली अवैध दारू सह ५,६८,४०० रुपयाचा मुद्देमाल,, घटना स्थळावरून आरोपी...

अहेरी पोलिसांनी पकडली अवैध दारू सह ५,६८,४०० रुपयाचा मुद्देमाल,, घटना स्थळावरून आरोपी फरार…

VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी 

अहेरी, ३० डिसेंबर २०२३ ::-  गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी मध्ये अवैध्य मार्गाने विक्रीसाठी आणत असलेली दारु वांगेपल्ली पुलाजवळ अहेरी पोलिसांनी पकडली असून फरार आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

गोपनीय माहिती मिळताच रात्रीच्या सुमारास वांगेपल्ली पुलाजवळ पंचासमक्ष सापळा रचून एका पिकअप वाहनास थांबविताच वाहन उभे करुन अंधाराचा फायदा घेऊन वाहन चालक कापसाच्या शेतात पळून जाण्यात यशस्वी झाला पिकअप वाहन क्रं MH40 BL 6225 ची तपासनी केली असता २३ बॉक्स देशी – विदेशी दारू किंमत १६८४०० रुपये व वाहन किंमत ४००००० रुपये असा एकूण ५६८४०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

सदरची कारवाई अहेरी पोलीस निरीक्षक मनोज काळबांधे, सहा पोलीस निरीक्षक चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सोनुने, पोहवा लोहबरे, शेंडे, तोरे, रणदिवे, तुलावी भारतसागर आदींनी केली आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक काळबांधे यांच्या मार्गदर्शनात पोहवा रणदिवे करीत आहेत.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular