Saturday, May 23, 2026
HomeAheriमाजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी हार्ट ऑपरेशन...

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी हार्ट ऑपरेशन साठी आर्थिक मदत…

VAINGANGA NEWS 24 /विशेष प्रतिनिधी  

गडचिरोली/अहेरी,०५-०१-२०२४::-तालुक्यातील चीरेपाल्ली येथील रहिवासी सुजिता मोहन तलांडे हिला हार्ट समस्या असल्यामुळे हिला दवाखान्यात हलवण्यात आली आहे.त्यांची घरची परिस्थिती हलखीची असल्याने त्यांना हार्ट ऑपरेशन साठी अडचण भासत होती.

     हीअडचण स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांन कडून आविसं – काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना समस्या सांगताच सुजिता तलांडे यांची नातेवाईकांना अहेरी जनसंपर्क कार्यालय येते बोलवून त्यांची समस्या जाणून घेऊन सुजिता तलांडे हिला औषध उपचारकरिता आर्थिक मदत करण्यात आली आहे.त्यावेळी अजयभाऊ त्या नातेवाईकांना सांगितले की पुढील उपचारा दरम्यान काही अडचण भासल्यास संपर्क करण्यात यावी म्हणून सांगितले आहे.तलांडे परिवारातील सर्व सदस्यांनी अजयभाऊंची आभार मानले.

    यावेळी उपस्थित अजय नैताम माजी जि.प.सदस्य,प्रशांत गोडसेलवार नगरपंचायत नगरसेवक, कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली,प्रमोद गोड्सेलवार,नरेश गर्गमसह आविसं – काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular