Saturday, May 23, 2026
HomeAheriमाजी पालकमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांच्या सहकार्याने आयोजित 'जय पेरसापेन क्रीडा मंडळ'...

माजी पालकमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांच्या सहकार्याने आयोजित ‘जय पेरसापेन क्रीडा मंडळ’ पेरमिली ग्रामीण कब्बड्डी सामने व 30 यार्ड क्रिकेट सामन्याच बक्षीस वितरण संपन्न…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी  

गडचिरोली/अहेरी,०९-०१-२०२४::-तालुक्यातील पेरमिली येथे ‘जय पेरसापेन क्रीडा मंडळ’ वतीने दि. 2 जानेवारी 2024 पासून ते 7 जानेवारी 2024 पर्यंत ग्रामीण कब्बड्डी सामने व 30 यार्ड क्रिकेट सामने घेण्यात आले.ग्रामीण कब्बड्डी सामने व क्रिकेट सामने या दोन्ही सामन्या करिता प्रथम क्रमांक विजेत्या संघाला 30,000/- (तीस हजार रुपये) बक्षीस, व द्वितीय क्रमांक विजेत्या संघाला 20,000/- (वीस हजार रुपये) बक्षीस, अहेरी इस्टेट चे राजे तथा माजी पालकमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांच्या कडून देण्यात आले.तर आणि तृतीय क्रमांक विजेत्या संघाला 10,000/- (दहा हजार रुपये) बक्षीस, युवा नेते अवधेषरावबाबा आत्राम यांचे कडून देण्यात आले. 

      यावेळी मोठ्या संख्येने स्पर्धकांनी ग्रामीण कब्बड्डी सामने व 30 यार्ड क्रिकेट सामन्याला स्पर्धेला हजरी लावली होती.    यावेळी बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री.प्रशांत ढोंगे माजी पंचायत समिती सदस्य यांच्या हस्ते विजयी संघांना बक्षीस वितरित करण्यात आले.त्यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून श्री.संदीप गावडे,श्री.संजय सडमेक, श्री.विट्टल मेश्राम, रघुनाथ मेश्राम,अविनाश मेश्राम,वासुदेव कोडापे,सुनील कांबळे,यशवंत मडावी,शंकर गावडे,संपत गावडे,देवराव मडावी हे होते.

      यावेळी मोठ्या उत्साहात क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी पेरमिली येथील गावकरी,युवा वर्ग आणि महिलावर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular