Saturday, May 23, 2026
HomeDhanora२२ जानेवारी हा दिवस दिवाळी सणासारखा उत्सव म्हणून साजरा करा,, आ. डॉ...

२२ जानेवारी हा दिवस दिवाळी सणासारखा उत्सव म्हणून साजरा करा,, आ. डॉ देवरावजी होळी…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

धानोरा शहरात आ. डॉ देवरावजी होळी यांनी वाटल्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या अक्षता.

प्रत्यक्ष घरोघरी संपर्क करून वाटल्या अक्षता

श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात साजरे करण्याचे केले धानोरा वासियांना आवाहन.

गडचिरोली/धानोरा,१२-०१-२०२४::-२२ जानेवारी रोजी अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांच्या भव्य मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून यानिमित्ताने संपूर्ण देशांत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त आपणही आपल्या धानोरा शहरात दिनांक २२ जानेवारी रोजी भजन, कीर्तन, धार्मिक प्रवचन, धार्मिक ग्रंथ वाचन कलश यात्रा, मंदिर झांकी यात्रा अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे भव्य दिव्य आयोजन करून हा दिवस दिवाळी सणासारखा उत्सव म्हणून साजरा करावा असे आवाहन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी धानोरा शहरात श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या अक्षता वाटपाच्या कार्यक्रमांतून केले.

यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष लताताई पुंगाटी, धानोरा न प च्या माजी नगराधक्षा लीनाताई साळवे, नगरसेवक संजय कुंडू, ज्येष्ठ नेते साजनजी गुंडावार, युवा नेते सारंग साळवे, विजय कुमरे, दिलीप गावळे, सुभाष खोबरे, साईनाथ जी साळवे, अनंत जी साळवे, राकडे महाराज, करीम अजाणी, सुनंदा वाघाडे, कीर्ती खरवळे, कीर्ती बर्वे, शेरकी ताई, ताराबाई कोटांगले, मुन्ना चंदेल, राकेश खरवळे, राकेश दास, नितीन सरकार, बबलू सेंगर यांचेसह भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular