Saturday, May 23, 2026
HomeChamorshiस्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांना जयंतीनिमित्त आ.डॉ.देवरावजी होळी यांनी केले अभिवादन...

स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांना जयंतीनिमित्त आ.डॉ.देवरावजी होळी यांनी केले अभिवादन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रीय युवा दिन साजरा.

गडचिरोली/चामोर्शी,१२-०१-२०२४::-तरुणांमध्ये हिंदुत्वाचा हुंकार भरणारे स्वामी विवेकानंद व हिंदवी स्वराज्याच्या प्रेरणास्त्रोत राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी आपल्या चामोर्शी येथील जनसंपर्क कार्यालयामध्ये त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.

स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून संपूर्ण देशात साजरा केला जातो या दिनाच्या निमित्ताने व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या निमित्ताने आमदार डॉ देवराव जी होळी यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालया त अभिवादनाच्या कार्यक्रम आयोजित केला. याप्रसंगी जिल्हा भाजपा सचिव दिलीपजी चलाख , साईनाथ जी बुरांडे युवा मोर्चाचे प्रतीक जी राठी,रामचंद्र वरवाडे, अंशुल दासरवार, विजय गेडाम, राजू पोटे जयरामजी चलाख ,भोजराजजी भगत यांचे सह मोठ्या संख्येने युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular