Saturday, May 23, 2026
HomeAheriमंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम चाचम्मा हकीम यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले...

मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम चाचम्मा हकीम यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

खंदे समर्थक गेल्याचे दुःख व्यक्त केले

गडचिरोली/अहेरी,१३-०१-२०२४::- वन वैभव शिक्षण मंडळाचे कोषाध्यक्ष चाचम्मा हकीम शुक्रवार 12 जानेवारी रोजी नागपूरच्या इस्पितळात सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान जगाचा निरोप घेतले.      राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम काल दुपारी चाचम्मा हकीम यांचे नागपुरातील इस्पितळात भेट घेऊन आज तात्काळ गडचिरोली येथून धाव घेऊन चाचम्मा हकीम यांचे पार्थिवाचे शनिवार 13 जानेवारी रोजी दुपारी हकीम यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शन घेतले.

    सामाजिक, शैक्षणिक, राजकीय जीवनात हकीम दांमप्त्याचे फार मोठे योगदान असून माझे सच्चे व खंदे समर्थक गेल्याचे दुःख व भावना व्यक्त केले.    तसेच आदिवासी सेवक बबूजी हकीम, बबलू भैय्या हकीम, शाहीन भाभी हकीम, जमीर हकीम,(छोटू भैय्या) समशेर पठाण, मकसुद शेख , लीना हकीम, लव्हली हकीम, डॉ. लुबणा हकीम, सुझेन हकीम, अमन हकीम व परिवारातील अन्य सदस्यांसोबत सांत्वनपर विचारणा केले.

    मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांच्या समवेत रा.काँ.चे जिल्हाध्यक्ष रवी भाऊ वासेकर, माजी जि.प.सदस्य नाना भाऊ नाकाडे, अरुण भाऊ मुक्कावार, सुरेंद्र अलोणे, अरविंद कात्रटवार व असंख्य सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular