Saturday, May 23, 2026
HomeAheriबोरी येथील भोई समाज बांधवांना मिळणार सुसज्ज सभा मंडप...

बोरी येथील भोई समाज बांधवांना मिळणार सुसज्ज सभा मंडप…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न* 

गडचिरोली/अहेरी,१३-०१-२०२४::-तालुक्यातील बोरी येथील भोई समाज बांधवांसाठी सुसज्ज सभा मंडप बांधकाम होणार असून शुक्रवार (12 जानेवारी) रोजी माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले.     बोरी येथे मोठ्या प्रमाणात भोई समाजबांधव वास्तव्याने आहेत. समाजाचा कुठलही कार्यक्रम घेण्यासाठी सभा मंडप नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.त्यामुळे प्रभाग क्रमांक 3 मधील लोकांनी सभा मंडपाची मागणी केली होती.भोई बांधवांची अडचण लक्षात घेऊन माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी पुढाकार घेऊन कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे ही मागणी रेटून धरली. अखेर आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत 7 लाख 50 हजार रुपयांची निधी मंजूर करण्यात आली असून येथे सुसज्ज सभा मंडप बांधकाम केले जाणार आहे.     नुकतेच शुक्रवारी माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न झाले.यावेळी राकॉचे तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार,महेश बाकीवार,साईनाथ अलवलवार,नागेश पुल्लीवार,अशोक वासेकर,विजय कोकीरवार, गव्वा कपेलवार,शंकर सुर्लावार,पोचम बाकीवार,संजय येल्लेलावार,भिमराव कपेलावार,सुरेश बाकीवार,राजन्ना सगांर्तीवार,रामन्ना गन्लावार,सिनू कपेलावार,संजय येल्लावार,पोचम मंचर्लावार,मल्ला कपेलावार तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular