VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
सावित्रीच्या लेकीच्या शिक्षणाची वाट सायकल ने केली सुकर.
गडचिरोली/अहेरी,१४-०१-२०२४::- शाळेपासून दूर असलेल्या विद्यार्थ्यांनीना शाळेत येण्यासाठी सोयीचे व्हावे, यासाठी मानव विकास मिशन अंतर्गत सायकल चे वाटप करण्यात येते.तालुक्यातील स्थानिक महागाव येथील राजे धर्मराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयच्या विद्यार्थ्यांनीना धर्मराव शिक्षण मंडळ चे अध्यक्ष तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते सायकल देण्यात आले आहेत.
यामुळे सावित्रीच्या लेकीच्या शिक्षणाची वाट सायकल ने सुकर केली आहे
महाराष्ट्र राज्य मानव विकास मिशन मार्फत ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांनीना मोफत सायकल वाटप करण्याची योजना शिक्षण विभागा कडून राबविण्यात येत आहे.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे,राजे धर्मराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक गोटेफोडे सर, सामाजिक कार्यकर्ते संतोष भाऊ उरेते,शिक्षक वर्ग,शिक्षकेत्तर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
