VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
3 दिवसीय भव्य ग्रामीण कबड्डी व व्हालिबॉल स्पर्ध्येचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते उदघाटन.
जय पेरसापेन युवा मंडळ व नेहरू युवा केंद्र आणि आदिवासी चेतना युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन.
गडचिरोली,२०-०१-२०२४::- मौजा जमगांव येथे जय पेरसापेन युवा मंडळ व नेहरू युवा केंद्र आणि आदिवासी चेतना युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 3 दिवसीय भव्य ग्रामीण कबड्डी व व्हालिबॉल स्पर्ध्येचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले याप्रसंगी खेळल्यामुळे शारीरिक विकास साधतो व मानसिकता प्रबळ बनते. खेळ ही एक शारीरिक कला आहे. दररोज किमान अर्धा ते एक तास खेळ खेळला पाहिजे. शालेय मुलांसाठी अभ्यासाबरोबर खेळ ही महत्त्वाचा आहे म्हणून खेळाचा समावेश शालेय अभ्यासात केला जातो.
यावेळी प्रामुख्याने सरपंच देविदास जी मडावी, कृ. उ. बाजार समिती संचालक हेमंतभाऊ बोरकुटे, मारोती हिचामी, अशोक कुमरे, महेश कुमरे, संदीप पोटावी, राजकुमार मडावी, बाजीराव गावळे, गिरीष मडावी, विनोद मडावी यांचेसह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते
