VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी
प्रभु श्रीरामाच्या जयघोषाने चामोर्शी नगरी दुमदुमली.
प्रभु श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठापणा निमित्त चामोर्शी येथे आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या उपस्थितीत कलश शोभा यात्रा.
गडचिरोली/चामोर्शी,२२-०१-२०२४::- अयोध्येतील प्रभु श्रीरामाच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची वाट भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात पाहिली गेली. या क्षणाला केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण देश रामाच्या भक्तीत राममय झाल्याचे दिसून आले असे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी या चामोर्शी येथील राम शोभा यात्रेच्या प्रसंगी केले.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वसंध्येला चामोर्शी नगरातील ४ ही राममंदिरात दिव्यांची आकर्षक रोषणाई करण्यात आली. संपूर्ण शहरात भगवामय वातावरणात तयार झाले. शहरभर प्रभु श्रीरामाचे बॅनर लावुन मार्कंडेश्वच्या पावन भूमीतील ही नगरी श्रीरामाच्या जयघोषाने दुमदुमू लागली.
कलश यात्रेची सुरुवात शहरातील महर्षी वाल्मिकी मंदिर येथून करण्यात आली असून पोलीस स्टेशन जवळील राम मंदिर, चवडेश्वरी मंदिर, लक्ष्मी गेट मुख्य मार्गाने शोभा यात्रा काढण्यात आली. याप्रसंगी आमदार डॉ. देवरावजी होळी,
चामोर्शी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा जयश्रीताई वायललवार, उपाध्यक्ष लोमेश बुरांडे, युवा नेते तथा शासकीय कॉन्ट्रॅक्टर अमोल आईंचवार,नगरसेवक राहुल नैताम, नगरसेविका सोनी सातपुते, माजी सभापती तथा नगरसेवीका प्रेमाताई आईंचवार, वर्षाताई भिवापूरे, भाजपा जिल्हा सचिव दिलीपजी चलाख, महामंत्री साईनाथ बुरांडे, जयराम चलाख, जिल्हा महामंत्री यश गण्यारपवार, प्रतीक राठी, रामचंद्र वरवाडे, विनोद पेशंट्टीवार तथा राम भक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
